Join us  

‘चला हवा येऊ द्या’ या शोचा विनोदवीर एन्जॉय करतोय पाऊस,पाहा हे खास फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:50 PM

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो.

कुणी निंदा कुणी वंदा हसवणं हाच आमचा धंदा म्हणत 'चला हवा येऊ द्या' मालिकेतील कॉमेडीयन रसिकांचं मनोरंजन करत आहेत. या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारे, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारे आणि तुफान मनोरंजन करणारा कॉमेडी अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. विविध स्कीट्सच्या माध्यमातून तो रसिकांचं मनोरंजन करतो. त्याचं कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका रसिकांना कायम भावतात.  कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे तो रसिकांना खळखळून हसवतो. कुशल सोशल मीडियावरही तितकाच एक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो.

नुकतंच कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.या फोटोत तो आणि त्याची पत्नी पाहायला मिळते आहे. यांत दोघंही पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. एका पिकनिक स्पॉटवरील हा फोटो असून दोघं चिंब पावसानं… या गाण्याच्या ओळीप्रमाणे पाऊस एन्जॉय करत आहेत. या फोटोला रसिकांकडून आणि कुशलच्या मित्रांकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. शुटिंगच्या बिझी शेड्युअलमधून वेळ काढत कुशल कायम कुटुंबीयांसह आनंदाचे क्षण घालवतो. पत्नीसह पाऊस एन्जॉय करतानाचा हा रोमँटिक क्षण कुशलसाठी नक्कीच स्पेशल असणार.

भाऊ आणि कुशल सोशल मीडियावरही तितकेच अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधत असतात.सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण ते रसिकांसह शेअर करतात. नुकतंच कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कुशल आणि भाऊ स्वतःच्या पत्नीविषयी तसंच जेवणाविषयी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांची जेवणाची आवड आणि पत्नी काय जेवण करते असा संवाद या दोघांमध्ये रंगल्याचं दिसतंय. या व्हिडीओसह कुशलने एक पोस्टही टाकली आहे. “बायकोच्या मिठीत आयुष्य काढण्याची स्वप्नं बघता बघता आपण कधी तिच्या मुठीत जातो कळतं नाही. अनुभवाने सांगतो खूप हसवणाऱ्या माणसाच्या आयुष्यात खूप दुःख दडलेले असतं” अशी पोस्टही कुशलने या व्हिडीओसह शेअर केली आहे. चला तर मग तुम्हीही जाणून घ्या काय आहे कुशलच्या मनातलं दुःख. 

टॅग्स :कुशल बद्रिके