Join us  

बोलके डोळे, हसरा चेहरा, मराठी मनावर अधिराज्य गाजवतेय ही अभिनेत्री, लहानपणीचा फोटो Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 9:51 AM

लहानपणीच्या फोटोमध्ये श्रेयाचा क्युट अंदाज पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळतंय.

जितके तिचे डोळे बोलके तितकीच जादू तिच्या अभिनयातही पाहायला मिळते. 'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे रसिकांची आवडती अभिनेत्री आहे.तिच्या विनोदी अंदाजाने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. आपल्यातील अभिनयकौशल्याच्या जोरावरच आज तिने स्वतःला सिद्ध करुन दाखवले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मराठी कलाकार त्यांच्या बालपणीच्या आठवणींना ऊजाळा देत पुन्हा एकदा जुन्या दिवसात रमताना दिसत आहे. आता मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेचाहा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

लहानपणापासूनच श्रेयाचा फोटोजेनिक चेहरा हे तिचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागले. लहानपणीच्या फोटोमध्ये श्रेयाचा क्युट अंदाज पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्स देत असल्याचे पाहायला मिळतंय. तिचा हा फोटो सोशल मीडियावरही व्हायरल होतोय. लहानग्या श्रेयाचा  क्युट अंदाज सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.काळ बदलला तरी काही आठवणी मनात तशाच असतात हेच श्रेयाचा फोटो पाहून आज प्रत्येकाला वाटत असलणार आणि चाहते देखील त्यांच्या बालपणीच्या आठवणीत रमले असणार हे मात्र नक्की.

आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग असते. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे  सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरते. विविध फोटोशूटमधून आपल्या दिलखेचक फोटोशूट करत रसिकांना घायाळ केलं आहे.

श्रेयाच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याची रसिकांमध्ये उत्सुकता असते. श्रेयाचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला असला तरी ती एका गुजराती कुटुंबाची सून आहे. 27 डिसेंबर 2015 रोजी श्रेया आणि निखील सेठ यांचा विवाह संपन्न झाला. श्रेया आणि निखील यांचे लव्ह मॅरेज आहे. आज दोघांचा सुखी संसार सुरु असून दोघं एकमेंकांसह खुश आहेत. सोशल मीडियावर निखिल आणि श्रेया यांचे एकत्र फोटो असून दोघेही कपल गोल देत असतात. 

 

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्या