Join us

सेलेब्रिटींची सेल्फि दिंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 02:07 IST

  फोटो सेशनमध्ये सेल्फि हा प्रकार असेल तरच फोटोसेशन पूर्ण झाल्यासारखे वाटते. अशा या सेल्फ ी प्रकाराने सर्वाना वेड लावून ...

  फोटो सेशनमध्ये सेल्फि हा प्रकार असेल तरच फोटोसेशन पूर्ण झाल्यासारखे वाटते. अशा या सेल्फ ी प्रकाराने सर्वाना वेड लावून सोडले आहे. तर यामध्ये मराठी सेलेब्रिटी तरी कसे मागे राहतील. सेल्फीच्या या मोहापायी चक्क मराठी कलाकारांनी रंगलेल्या एका नाटयसंमेलनाच्या उद्घाटनावेळी सेल्फी काढला. आणि तो सोशलमिडीयावर झळकताना दिसत आहे. तसेच  त्या फोटोला सेल्फी दिंडी असे नावदेखील देण्यात आले. या सेल्फीमध्ये ललित प्रभाळकर, सुकन्या मोने, सुशांत शेलार, ऋजुता देशमुख, लोकेश गुप्ते, संकेत कुलकर्णी  असे अर्धी मराठी इंडस्ट्रीचेच दर्शन होते.