Join us

सुतार बनला निर्माता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2016 14:21 IST

एक मा जो बनी लाखो की अम्मा ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेची निर्मिती असिफ ...

एक मा जो बनी लाखो की अम्मा ही मालिका सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेची निर्मिती असिफ शेखची आहे. असिफ आज निर्माता बनला असला तरी त्याच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. असिफ सुरुवातीला एक सुतार म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने प्रोडक्शन हाऊसेसमध्ये छोटी-मोठी कामे करायला सुरुवात केली. त्याने आशिक बनाया अपने, मे मेरी पत्नी और वो या चित्रपटांच्या प्रोडक्शन टीमसोबतही काम केले आहे. तो प्रोडक्शन हाऊससोबत काम करण्यासोबतच सुनील शेट्टीचा बिझनेस मॅनेजर म्हणूनही काम करत होता. आज इतक्या वर्षांच्या स्ट्रगलनंतर असिफने मालिकेची निर्मिती केली आहे. तो त्याला मिळालेल्या या यशासाठी खूप आनंदी आहे.