Join us

पुन्हा येतोय पिंजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 21:37 IST

काळाच्या ओघात काही अभिजात कलाकृती लक्षात राहतात. प्रत्येकाच्या मन:पटलावर कलाकारांच एक वेगळेच स्थान असते.  त्याचप्रमाणे ७० व्या दशकात आलेल्या ...

काळाच्या ओघात काही अभिजात कलाकृती लक्षात राहतात. प्रत्येकाच्या मन:पटलावर कलाकारांच एक वेगळेच स्थान असते.  त्याचप्रमाणे ७० व्या दशकात आलेल्या व्ही शांताराम दिग्दर्र्शित पिंजरा या चित्रपटानेही रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. या सुंदर कलाकृतीचा नजराणा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर सादर होणार आहे. श्रीराम लागू , संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेल्या पिंजराने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. आता तीच जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  या अभिजात कलाकृ तिला नवीन साज चढवला आहे. या चित्रपटामध्ये संवाद, गाणी, पाश्वर्संगीत, तांत्रिकबाबी या महत्त्वपूर्ण गोष्टींचे विभाजन करत त्यात काही बदल करण्यात आले आहे.  या चित्रपटातील संवाद शंकर पाटील, संगीत राम कदम, गीत जगदीश खेहुडकर, ध्वनी ए.के. परमार, लिंगनूरकर, पूनमिश्रण व गीतमुद्रण मंगेश देसाई यांनी केले असून एंकदरीत मूळ कलाकृतिला धक्का न लावता नव्या अंदाजातील पिंजरा आता लवकरच प्रेक्षकांना मोहिनी घालण्यासाठी येत आहेत. जून्या पिंजºया प्रमाणे आता कलरफूल पिंजरा किती प्रेक्षकांना आवडेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.