Join us  

Bride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 12:33 PM

बॉयफ्रेंड सोहेल खंडवानीसोबत तिचा साखरपुडा झाला असून सोहेल हा दुबईतील रिअल स्टेट बिझनेसमन आहे.

छोटा पडदा असो किंवा मग किंवा मोठा पडदा असोे... कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत संसार थाटला आहे.आता याच यादीत 'साथ निभाना साथिया' या मालिकेतील किंजलची भूमिका साकारणारी अभिनेत्री फिरोजा खान हिनचाही साखरपुडा झाला आहे. बॉयफ्रेंड सोहेल खंडवानीसोबत तिचा साखरपुडा झाला असून सोहेल हा दुबईतील रिअल स्टेट बिझनेसमन आहे.खुद्द फिरोजानेच सोशल मीडियावर भावी पतीसोबत फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. 

 

फिरोजाने फोटो पोस्ट करून त्यासोबत आम्ही दोघांनी आयुष्यभर एकत्र राहायचे ठरवले आहे असे कॅप्शन देखील दिले आहे.दीड वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.  फिरोजाने 'कोई लौट के आया है' आणि 'जाना न दिल से दूर' या टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. मात्र ती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली ते 'साथ निभाना साथिया' मालिकेतून. या मालिकेतील तिच्या भूमिकेला रसिकांनी चांगील पसंची दर्शवली होती. 

आज फिरोजाचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही एक खूपच चांगली बातमी आहे. मात्र या दोघांच्या लग्नाची तारिख कधी ठरणार , हे दोघे कोणत्या तारखेला लग्न करणार याविषयी लवकरच फिरोजा सांगणार असल्याचे तिने म्हटले आहे. तसेच लगीनघाई सुरू झाल्यामुळे इतरांप्रमाणे फिरोजाही आपल्या आयुष्यातला खास स्पेशल बनवण्यासाठी खास प्लॅनिंग करत आहे.  डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचे बोलले जात असून सध्या ते चांगल्या लोकेशनच्या शोधात असल्याच्याही चर्चा आहेत. तसेच फिरोजा आणि तिचा बॉयफ्रेंडविषयी बोलताना म्हटले की, दोघांच्याही आवडी निवडी आणि ब-याच गोष्टी खूप कॉमन असल्यामुळे तो चांगला जोडीदार ठरू शकतो त्यामुळे सोहेल  पसंत केल्याचे फिरोजाने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.सध्या दोघेही लग्नाच्या तयारीला लागले आहेत.