Join us  

'बिग बॉस १७' मध्ये होणार ममता कुलकर्णीची एन्ट्री? ड्र्ग्ज केसमुळे सलमानच्या हिरोईनने भारतातून काढलेला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 4:29 PM

Bigg Boss 17: आता बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची 'बिग बॉस १७'मध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. पहिल्या सीझनपासून या रिएलिटी शोवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. लखलखत्या दुनियेतील चंदेरी तारे 'बिग बॉस'च्या घरात पाहायला मिळतात. भांडण-तंटा, कलाकारांमधील वाद, गेम्स यामुळे बिग बॉसच्या खेळाला रंगत चढते. सध्या प्रेक्षकांना आतुरता आहे ती 'बिग बॉस १७' ची. 

'बिग बॉस १७' हे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबद्दल रोज नवीन माहिती समोर येत आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची 'बिग बॉस १७'मध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगली आहे. आशिक आवार, करण अर्जुन यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठोका चुकवणारी ममता 'बिग बॉस'च्या घरात दिसणार असल्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'बिग बॉस'च्या टीमकडून ममता कुलकर्णीला नव्या पर्वासाठी विचारण्यात आलं आहे. 

सध्या ममता कुलकर्णी केन्यामध्ये वास्तव्यास आहे. तिथे तिने व्यवसाय सुरू केल्याची माहिती आहे. दो हजार ड्रग्ज केस रॅकेटमध्ये ममताचे पती विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. त्यामुळे ममता कुलकर्णीही चर्चेत आली होती. ड्रग्ज केस प्रकरणातील ममता कुलकर्णी मुख्य आरोपी आहे. तिचे बँक अकाऊंट आणि मुंबईतील फ्लॅटला सील करण्यात आलं आहे. त्यामुळे ममता मुंबईत आल्यास तिला अटक होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :बिग बॉसममता कुलकर्णीसलमान खान