Join us  

Birthday Special: 'रंग माझा वेगळा'मधील कार्तिक उर्फ आशुतोष गोखले आहे या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 12:53 PM

कार्तिकच्या भूमिकेतून अभिनेता आशुतोष गोखले घराघरात पोहचला आहे. आज आशुतोष गोखलेचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्याबद्दल..

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली. या मालिकेत दीपाची भूमिका साकारते आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे तर कार्तिकची भूमिका निभावतो आहे अभिनेता आशुतोष गोखले. या मालिकेतून आशुतोष घराघरात पोहचला आहे. आज आशुतोष गोखलेचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या प्रवासाबद्दल..

फार कमी लोकांना माहित आहे की आशुतोष गोखले सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे आणि त्याला अभिनयाचे बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले आहे. नाटक, मालिका आणि चित्रपटात अविरत काळ गाजवणारे अभिनेते विजय गोखले यांची अभिनय कारकीर्द सर्वश्रुत आहेतच. पण, त्यांचा मुलगा आशुतोष गोखले याने देखील अभिनयात आपली वेगळी छाप उमटविली आहे.

आपल्या वडिलांचे काम जवळून न्याहाळणाऱ्या आशुतोषला लहानपणासूनच अभिनयाचे वेड लागले ते त्याच्या वडिलांकडूनच. 

आशुतोषचे ग्रॅज्युएशन रुपारेल कॉलेजमधून झाले आहे. कॉलेज जीवनात त्याने नाटक आणि एकांकिका स्पर्धेत सहभाग आहे. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर त्याने नाटकात काम करायला सुरूवात केली.

झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेतही आशुतोषने काम केले. त्याने सुबोध भावेच्या भावाची भूमिका केली होती. त्यानंतर तो रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिकच्या भूमिकेत पहायला मिळतो आहे. 

रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिक आणि दीपा एकत्र राहत नाही. दीपाच्या पोटात असलेली मुले त्याची नाहीत, असा त्याला गैरसमज झाला आहे. त्यामुळे तो तिचा द्वेष करतो आणि कार्तिक दारूच्या आहारी गेला आहे.

तर एकीकडे सौंदर्याला दीपाचे खरे रुप कळल्यामुळे तिला दीपाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे कार्तिक दीपाला घटस्फोट देण्याची तयारी करतो आहे. त्यामुळे दीपा आणि कार्तिकमधील गैरसमज दूर होईल का ?, भविष्यात ते एकत्र येतील का? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :आशुतोष गोखलेविजय गोखलेस्टार प्रवाहतुला पाहते रे