बिग बॉस स्पर्धक नोरा फतेहीचा बिकनी अवतार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 12:21 IST
नोरा फतेहीने बिग बॉसच्या मागच्या सिझनमध्ये सगळ्यांची मन जिंकली होती. या कार्यक्रमामुळे तिच्या फॅन फॉलॉविंगमध्ये वाढ झालेली आहे. बिग ...
बिग बॉस स्पर्धक नोरा फतेहीचा बिकनी अवतार
नोरा फतेहीने बिग बॉसच्या मागच्या सिझनमध्ये सगळ्यांची मन जिंकली होती. या कार्यक्रमामुळे तिच्या फॅन फॉलॉविंगमध्ये वाढ झालेली आहे. बिग बॉसनंतर नोरा झलक दिखला जा या रिअॅलिटी शोमध्ये झळकली. या कार्यक्रमातदेखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम तिला मिळाले. या कार्यक्रमातील तिच्या डान्सद्वारा ती एक चांगली डान्सर असल्याचे तिने सिद्ध केले आहे. नोराला छोट्या पडद्यावरची सेक्सिएस्ट वुमन मानले जाते. नोराने नुकतेच किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी एक फोटोशूट केले. या फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. किंगफिशरचे कॅलेंडर हे प्रचंड प्रसिद्ध आहे. या कॅलेंडरवर कोणत्या मॉडेल्स झळकणार याची सगळ्यांना उत्सुकता असते. विशेष म्हणजे या कॅलेंडरवर असणाऱ्या फोटोंमध्ये सगळ्याच मॉडेल या केवळ स्विमिंग कॉस्च्युममध्येच असतात. यंदाच्या किंगफिशर कॅलेंडरमधील नोराचे फोटो हे सध्या चांगलेच चर्चिले जात आहे. या फोटोंमध्ये घातलेल्या स्विमिंग सूट आणि बिकनीमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट काही दिवसांपूर्वी ग्रीस येथे करण्यात आले. या कॅलेंडरवरील सगळे फोटो हे प्रसिद्ध फोटोग्राफर अतुल कसबेकरने काढले आहेत. अतुल एक फोटोग्राफर असण्यासोबतच सोनम कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या निरजा या चित्रपटाचा निर्माता आहे. या कॅलेंडरच्या फोटोशूटचे काही फोटो नुकतेच नोराने तिच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केले आहेत. या फोटोला खूप साऱ्या लाईक्स मिळत असून खूप सारे कमेंटदेखील येत आहेत. नोराप्रमाणेच वर्तिका सिंग, डायना येरप्पा, हेलन गोम्स, कनिष्टा धानकर या मॉडेल्स या कॅलेंडरवर झळकल्या आहेत.