Join us  

Bigg Boss12: ‘बिग बॉस’च्या घरात श्रीसंतने वापरला फोन? व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 1:34 PM

Bigg Boss12: ‘बिग बॉस’च्या १२ व्या सीझनची सुरूवात होताच, एकापाठोपाठ एक धमाकेदार गोष्टी समोर येत आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरातील आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

‘बिग बॉस’च्या १२ व्या सीझनची सुरूवात होताच, एकापाठोपाठ एक धमाकेदार गोष्टी समोर येत आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरातील आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. होय, ‘बिग बॉस12’च्या घरात मोबाईल फोन वापरण्याची परवानगी नाही, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. पण ‘बिग बॉस12’च्या एका स्पर्धकाने हा नियमचं धाब्यावर बसवल्याचे उघड झाले आहे. होय, ‘बिग बॉस12’च्या घरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. या व्हिडिओने ‘बिग बॉस12’व्या विश्वासार्हतेवर भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. होय, या व्हिडिओत ‘बिग बॉस12’चा स्पर्धक श्रीसंत मोबाईल फोन वापरताना दिसतोय. व्हायरल झालेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

या व्हिडिओत रात्रीच्या अंधारात श्रीसंतच्या हातात काहीतरी दिसतेय. ही वस्तू मोबाईल असल्याचे भासतेय. अंधारात आपल्या बेडवर बसून श्रीसंत ब्लँकेट खाली मोबाईल लपवण्याचा प्रयत्न करतोय. आता श्रीसंतच्या हाती खरचं मोबाईल आहे की आणखी काही आहे, हे तोच जाणो. पण लोकांनी या व्हिडिओचा काढायचा तो अर्थ काढलाय.‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री करताचं भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू श्रीसंतने वाद ओढवून घेतला होता. सबा खान आणि सोमी खानसोबत पहिल्याचं दिवशी त्याचे इतके कडाक्याचे भांडण झाले की, श्रीसंतने घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. ‘बिग बॉस’च्या प्रवेशद्वारापाशी उभा होऊन दरवाजा उघडा, मला बाहेर जावू द्या, अशी विनंती करताना तो दिसला होता. आता श्रीसंत या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. यापूर्वी श्रीसंत ‘झलक दिखला जा’मध्ये दिसला होता. हा शो सुद्धा श्रीसंतने मध्येच सोडून दिला होता.

टॅग्स :बिग बॉस 12श्रीसंत