Join us  

या कलाकारांनी घेतली बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:21 PM

'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे कलाकार घरात एंट्री करणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशन कार्य. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात आली. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारे हे कार्य होते. सई बिग बॉस मराठीच्या घराची कॅप्टन असल्याने ती सुरक्षित होती. काल नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये रेशम, आस्ताद आणि स्मिता नॉमिनेट झाले तर मेघा, शर्मिष्ठा, पुष्कर हे या आठवड्यामध्ये सुरक्षित आहेत.  तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर पडणार  ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार ? कोण सुरक्षित होणार ? हे बघणे रंजक असणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहेत कलर्स मराठीवरील  राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच विणा जगताप. तसेच लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे कलाकार घरात एंट्री करणार आहेत.

 

आपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भवो असे म्हंटले जाते. पाहुणचार हे आपले वैशिष्ट्य आहे. आज बिग बॉसच्या घरामध्ये आलेले पाहुण्यांचे योग्य ते आदरातिथ्य व्हावे यासाठी बिग बॉसचे घर हॉटेल मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. सर्व सदस्यांनी मिळून हे कार्य करायचे असे बिग बॉस सांगणार असून सई घराची कॅप्टन असल्याने या हॉटेलची ती मॅनेजर असणार आहे. हॉटेलमध्ये अतिथी म्हणून राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच विणा जगताप येणार आहेत. आणि घरातील सदस्यांना त्यांची सेवा करायची आहे. त्यानंतर लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेतील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे देखील येणार आहेत. यांचे मनोरंजन करण्यासाठी पुष्करने एक छान लावणी देखील सादर केली आहे. हे सगळे मिळून हॉटेलमध्ये आलेल्या अतिथींची कशी काळजी घेणार ? कोणते कोणते टास्क त्यांना मिळणार ? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

  

टॅग्स :बिग बॉस मराठीसचित पाटील