Join us  

'Bigg boss'फेम विशाल निकमच्या भावाला पाहिलंय का? पाहा दोन्ही भावंडांचा झकास स्वॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2022 5:49 PM

Vishal nikam: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या विशालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो म्हणून विशेष चर्चेत राहणारा कार्यक्रम म्हणजे 'बिग बॉस मराठी'(Bigg boss marathi). अलिकडेच या शोचं तिसरं पर्व पार पडलं. मात्र, तरीदेखील त्यातले स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहेत. हा शो संपल्यानंतर सोनाली पाटील, मीनल शहा, विशाल निकम आणि विकास पाटील या चौघांची सातत्याने चर्चा होते. घराबाहेर पडल्यानंतरही या चौघांमधील मैत्री टिकून आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हे कलाकार कायम त्यांच्या प्रोफेशनल व पर्सनल लाइफविषयीचे काही ना काही अपडेट्स देत असतात. यात अलिकडेच विशालने त्याच्या भावासाठी एक पोस्ट लिहिली आहे.

सध्या विशाल छोट्या पडद्यावरील 'आई: मायेचं कवच' या मालिकेत मानसिंग ही भूमिका साकारत आहे. त्यामुळे मालिकेच्या माध्यमातून तो दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यात सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या विशालने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचा भावासोबत झक्कास स्वॅग पाहायला मिळत आहे.

"भाऊ हा शब्द उलटा वाचला की "उभा" जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तोच आपला भाऊ !", असं कॅप्शन देत विशालने त्याच्या भावासोबत व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर विशाल सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. त्यानंतर सध्या तो 'आई मायेचं कवच' या मालिकेमुळे चर्चेत येत आहे. विशालने या मालिकेपूर्वी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :विशाल निकमबिग बॉस मराठीसेलिब्रिटी