Join us  

Bigg Boss Marathi 4 : मला त्या बाहेरच्या जगात जायचंच नाही...; अपूर्वा नेमळेकर रमली ‘बिग बॉस’च्या घरात, आता...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 6:16 PM

Apurva Nemlekar, Bigg Boss Marathi 4 : अपूर्वाच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अपूर्वा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलतेय.

Bigg Boss Marathi 4 : ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं नाव घेतलं की, दोनच चेहरे डोळ्यांपुढे येतात, ते म्हणजे अण्णा आणि शेवंता. शेवंताची भूमिका साकारली होती अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ( Apurva Nemlekar) हिने.  आता हीच अपूर्वा ‘बिग बॉस मराठी 4’चं घर गाजवतेय. होय, बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये अपूर्वा स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. अपूर्वाची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आणि तशी ती चर्चेत आली. पहिल्याच आठवड्यात तिने घरात तुफान राडा घातला. अनेकांशी तिचं वाजलं. आता बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. होय, अपूर्वा तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलली. माझ्या जगात फक्त मी आणि माझी आई आहे, असं ती म्हणाली.

अपूर्वाच्या ऑफिशिअल इन्स्टा अकाऊंटवर बिग बॉस मराठीच्या घरातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अपूर्वा तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलतेय.

‘ बिग बॉसच्या घरात मज्जा तर येते पण या 75 दिवसांनी मला खूप चॅलेंजेस दाखवली, खूप टास्क दिले पण हे दिवस मला बदलण्यासाठी आहेत आणि मी थोडीफार बदलली देखील आहे. माज्यातली हरवलेली अपूर्वा मला इकडे येऊन सापडली,’असं कॅप्शन देत अपूर्वाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती राखी सावंतसोबत गप्पा मारताना दिसतेय. याबद्दल ती प्रेमाबद्दल बोलतेय.

ती म्हणते, ‘फक्त २१ दिवस राहिले आहेत आणि मला नाही जायचंय घरी...मला त्या बाहेरच्या जगात जायचंच नाही. काही नाहीये बाहेर. फक्त आई आहे. फक्त मी आणि माझी आई आहे. त्याशिवाय जे जग आहे, ते इथे आहे. अब मुझे कुछ खोने का डर नहीं... बहुत कुछ खो दिया है जिंदगी में...  यामुळेच मला काही गमवायचं दु:ख नाही. ना मला प्रेम हवंय. मला प्रेमाची गरज नाहीये आता. मी जशी आहे, तशी मी खूश्श आहे. मी आता जशी आहे तशीच मला खूप आवडते. या 75 दिवसांत मी खूप काही शिकले. जी हरवलेली अपूर्वा होती, ती मला इथे सापडली.  हे 100 दिवस मला बदलण्यासाठी होते असं मला वाटतंय.   मी गेल्या काही वर्षात इतकी हसलेच नव्हते जे आता हसलीय. मजा करतेय, वेडेपणा करतेय, यामुळे मी फार आनंदी आहे, असं अपूर्वा म्हणाली.

 बिग बॉसचा ग्रँड फिनाले जवळ...‘बिग बॉस मराठी 4’चा ग्रँड फिनाले आता जवळ आला आहे. होय, येत्या 8 जानेवारीला ‘बिग बॉस मराठी 4’ ग्रँड फिनाले रंगणार आहे. अर्थात कलर्स मराठी वाहिनीने याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरबिग बॉस मराठी