Join us  

Bigg boss marathi 3: हल्लाबोल! महिला सदस्यांवर कचरा फेकल्यामुळे तृप्ती देसाई ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2021 3:03 PM

Trupti desai : सुरेखा कुडची व सोनाली पाटील या बाईकवर बसल्यानंतर त्यांना उठवण्यासाठी तृप्ती देसाईंनी त्यांच्यावर कचरा, साबणाचं पाणी फेकलं.

ठळक मुद्देअलिकडेच बिग बॉसच्या घरात सदस्यांना हल्लाबोल टास्क देण्यात आला होता.

महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई सध्या बिग बॉस मराठीच्या घरात दिसून येत आहेत. यंदा बिग बॉस मराठीचं (bigg boss marathi) तिसरं पर्व पार पडत असून या शोमध्ये तृप्ती देसाईंनी (Trupti desai) सहभाग घेतला आहे. या घरात प्रवेश केल्यापासून त्या सातत्याने चर्चेत येत आहे. अलिकडेच 'बिग बॉसचा आवाज स्त्रीचा हवा', असं म्हणत चर्चेत आलेल्या तृप्ती देसाई आता घरातील महिलावर कचरा फेकल्यामुळे चर्चेत आल्या आहेत. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर चर्चेत नव्हे त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत. 

प्रत्येक वेळी महिलांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या तृप्ती देसाईंनी टास्क खेळत असताना कोणताही विचार न करता थेट महिला सदस्यांच्या अंगावर कचरा फेकला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.अलिकडेच बिग बॉसच्या घरात हल्लाबोल हा टास्क पार पडला.  

या टास्कमध्ये सुरेखा कुडची आणि सोनाली पाटील मोटर बाईकवर बसल्या होत्या. यावेळी त्यांना बाईकवरुन उठवण्यासाठी प्रतिस्पर्धी टीमने अनेक प्रयत्न केले. यात या दोघींच्याही अंगावर कचरा, साबणाचं पाणी फेकण्यात आलं. इतकंच नाही तर या सगळ्यांमध्ये तृप्ती देसाईंचाही सहभाग होता. त्यांनी दादूसच्या मदतीने घरातील कचरा आणत तो सुरेखा- सोनालीच्या अंगावर टाकला. त्यांचा हा प्रकार पाहून अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोलिंगला सुरुवात केली आहे. 

'महिलांसाठी लढणाऱ्या तृप्ती ताई आता महिलांवरच कचरा फेकत आहेत', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'तृप्ती ताई जरा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये दिसतायेत',  'महिलांची लीडर महिलांवर कचरा फेकते. काय तत्व पाळतात?', असं म्हणत अनेकांनी तृप्ती देसाईंना ट्रोल केलं आहे.

अशोक सराफ यांच्यामुळे एकता कपूर झाली 'Tv queen'; जाणून घ्या ही भन्नाट स्टोरी

नेमकं काय आहे प्रकरण?

अलिकडेच बिग बॉसच्या घरात सदस्यांना हल्लाबोल टास्क देण्यात आला होता. यामध्ये A आणि B असे दोन गट पाडण्यात आले होते. यामध्ये मोटर बाईकवर बसलेल्या दोन स्पर्धकांना उठवण्यासाठी विरुद्ध गटातील स्पर्धकांना प्रयत्न करायचा होता. त्यामुळे सुरेखा कुडची व सोनाली पाटील या बाईकवर बसल्यानंतर त्यांना उठवण्यासाठी तृप्ती देसाईंनी त्यांच्यावर कचरा, साबणाचं पाणी फेकलं. इतकंच नाही तर त्यांच्यावर अंडीदेखील फोडली त्यामुळे तृप्ती देसाई सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.  

टॅग्स :तृप्ती देसाईबिग बॉस मराठीसेलिब्रिटी