Join us  

Bigg Boss Marathi 2ः शिवानी सुर्वे या अभिनेत्यासोबत आहे नात्यात, बिग बॉसच्या घरात दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 7:00 PM

शिवानी सुर्वे आपल्‍या बिनधास्‍त स्‍वभावाबद्दल आणि मनमोकळ्या वागण्‍याबद्दल ओळखली जाते. ती नुकतीच घरात तिच्या प्रियकराविषयी बोलताना दिसली.

ठळक मुद्दे व्‍हेन व्ही स्‍टार्टेड नोइंग इच अदर... तेव्‍हा आय वॉज १९ आणि अजिंक्‍य वॉज २२. तर ती फॅशन आली होती तेव्‍हा दॅट कपल हॅव सेम टॅटूज. सो मी हा क्‍वीनचा टॅटू काढला आहे आणि त्‍याने किंगचा टॅटू काढलाय!''

बिग बॉस मराठी 2 या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी शिवानी सुर्वेची रिएंट्री झाली आहे. शिवानी आरोग्यविषयक काही तक्रारीमुळे कार्यक्रमातून बाहेर गेली होती आणि आता ती पुन्हा एकदा या कार्यक्रमात परतली आहे. शिवानी सुर्वे आपल्‍या बिनधास्‍त स्‍वभावाबद्दल आणि मनमोकळ्या वागण्‍याबद्दल ओळखली जाते. वूटच्‍या अनसीन अनदेखाच्‍या नवीन क्लिपमध्‍ये शिवानी किशोरी शहाणेला तिच्‍या टॅटूबद्दल सांगताना दिसत आहे. 

''हे काय आहे? मुकुट? कशासाठी आहे?'' असे किशोरी शिवानीच्‍या टॅटूकडे बघून विचारते तेव्‍हा शिवानी सांगते, ''मी आणि अजिंक्‍य आम्‍ही दोघे पण खूप इमॅच्‍युअर होतो... व्‍हेन व्ही स्‍टार्टेड नोइंग इच अदर... तेव्‍हा आय वॉज १९ आणि अजिंक्‍य वॉज २२. तर ती फॅशन आली होती तेव्‍हा दॅट कपल हॅव सेम टॅटूज. सो मी हा क्‍वीनचा टॅटू काढला आहे आणि त्‍याने किंगचा टॅटू काढलाय!''

शिवानी पुढे सांगू लागते, ''पण जिथे आम्‍ही टॅटू काढायला गेलो होतो त्‍याने माती खाल्‍ली, म्‍हणजे बघा ना कसा काढलाय वेडा वाकडा! इट डझन्‍ट लूक्‍स लाइक क्‍वीन्‍स टॅटू. मला खूप लोकांनी चिडवलं सुद्धा होतं यावरुन. पण अजिंक्‍यचा टॅटू खूप छान झाला, त्‍याने मुद्दामून माझा टॅटू असा केला. एकदा बसल्या बसल्या ६-६.३०ला आम्‍ही ठरवलं की टॅटू करायचा आणि संध्‍याकाळी ८ वाजता जाऊन आम्‍ही टॅटू काढून देखील घेतला.'' 

यावर किशोरीने टॅटूबद्दल आपले मत व्‍यक्‍त केले की, ''मला याचं आकर्षणच नाही राहिलं कधी! कारण ही परमनन्‍ट गोष्‍ट आहे. त्यामुळे कधी व्‍हरायटी पाहिजे असेल तर काय करायचे... पण आता मला कळलं आहे मला की लेझरने काढू शकतात वगैरे.''  आनंदाने शिवानी सांगते, ''इट्स बीन फाईव्ह इअर्स नाऊ!'' 

अजिंक्य ननावरे हा देखील अभिनेता असून त्याने असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, सख्या रे, गर्ल्स हॉस्टेल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तू जीवाला गुंतवावे या मालिकेत अजिंक्य आणि शिवानी यांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली आणि काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 

टॅग्स :बिग बॉस मराठीशिवानी सुर्वे