Join us

'बिग बॉस'चा को-डायरेक्टर आहे बंदगी कालराचा बॉयफ्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 17:41 IST

'बिग बॉस'चा मध्ये दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या भागातून स्पर्धक सहभागी होत असतात. घरातही अनेक वादविवाद रंगत असताना प्रेमाचे अंकुरही ...

'बिग बॉस'चा मध्ये दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळ्या भागातून स्पर्धक सहभागी होत असतात. घरातही अनेक वादविवाद रंगत असताना प्रेमाचे अंकुरही फुलताना दिसतात.मात्र आता एक स्पर्धक जी इतर स्पर्धकांप्रमाणे जास्त कॅमेरा समोर आलेली नाहीय. ती स्पर्धक म्हणजे बंदगी कालरा. शिल्पा शिंदे, ज्योती कुमारी, जुबैर खान आणि अर्शी खानसोबत बंदगीला पहिल्या एविक्शनसाठी नॉमिनेट करण्यात आले होते. बिग बॉसच्या फ्रायडे का फैसलामध्ये बंदगी तिचा सह-स्पर्धक पुनीश शर्मासोबत जवळीक वाढवताना दिसली होती.बंदगी आणि पुनीश शोमध्ये एक प्लान आखताना दिसले होते. शोमध्ये फारसे रसिकांना तिचे दर्शन घडले नसले तरीही ती एका कारणामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस मध्ये सहभागी होण्याचे तिचे अनेक वर्षापासून स्वप्न असल्याचे बोलले जाते.मात्र तशी संधी तिला काही मिळाली नाही.मात्र बिग बॉसमध्ये स्पर्धक बनण्याचे बंदगीचे स्वप्न एका व्यक्तीमुळे पूर्ण झाले होय,'बिग बॉस'च्या सहदिग्दर्शकासोबत बंदगीचे खास कनेक्शन आहे.एका न्युज पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार  बंदगी 'बिग बॉस'चा कास्टिंग आणि को-डायरेक्टर डेनिस नागपालची गर्लफ्रेंड आहे.अलीकडेच डेनिसने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्वीट करुन प्रेक्षकांना बंदगीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले होते.डेनिसमुळेच आज बंदगी बिग बॉस सिझन 11 ची स्पर्धक बनली आहे. बंदगीलाही इतरांप्रमाणे अभियक्षेत्रात आपले नशीब आजमवायचे आहे. त्यामुळे बिग बॉस शोमुळे तिला या क्षेत्रात एंट्री करणे शक्य होईल.त्यामुळे बिग बॉसही तिची पहिली पाहिरी असल्याच्या चर्चा आहेत. मुळआत बंदगी ही दिल्लीची राहणारी असून कॅपेजेमिनी इंडिया या सॉफ्टवेअर कंपनीत सीनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे.यंदासुद्धा हा शो एका वेगळ्या थीमवर आधारित आहे.यंदाच्या बिग बॉसमध्ये पडोसी म्हणजेच शेजारी ही थीम असणार आहे. या अनोख्या आणि वेगळ्या थीमच्या माध्यमातून बिग बॉस-11 रसिकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास यावेळी सलमान खानने व्यक्त केला. या शोच्या माध्यमातून रसिकांचं तुफान मनोरंजन होईल असं सलमानला वाटत आहे. दरवेळीप्रमाणे यंदाही सेलिब्रिटींसह सामान्य जनतेमधील प्रतिनिधीसुद्धा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाले आहेत.