Join us  

Bigg Boss 15 : शमिता शेट्टी आणि अफसाना खानमध्ये या कारणामुळे झाली खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 3:52 PM

Bigg Boss 15: नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात अफसाना खानचा पारा चढलेला पहायला मिळाला.

बिग बॉस १५मध्ये दोन ग्रुपमध्ये चांगलीच खडाजंगी सुरू आहे. एकीकडे बिग बॉस घरात एन्ट्री घेतलेले सदस्य आहेत. जे घरात कुणाला आत येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे जंगलवासीय घरात एन्ट्री मिळवण्यासाठी आपले प्रयत्न करत आहेत. या प्रक्रियेत त्या दोन्ही ग्रुप्समध्ये वादविवाद, भांडणे पहायला मिळत आहेत. शुक्रवारी रिलीज झालेल्या भागात अफसाना खानचा पारा चढलेला पहायला मिळाला. 

शेवटच्या भागात अफसाना खान आणि शमिता शेट्टी यांच्यामध्ये शाब्दिक लढाई सुरू होती. सर्व घरातल्यांनी अफसाना खानला टास्कदरम्यान लाथ का मारली असे विचारले होते. यादरम्यान शमिता अफसानाला खोटारडी बोलली. अफसाना खान आधीपासून भडकलेली होती. त्यात तिला आणखी राग आला आणि नाराजीच्या सुरात ती शमिताला म्हणाली की, तू कोण आहेस?

अफसानाचा रोष पाहून शमितादेखील भांडण्याच्या मूडमध्ये आली आणि तिला म्हणाला की, काय..इकडे येना. अफसाना याच्या उत्तरात आपली चप्पड शमिताकडे फेकली आणि म्हणाली की, चप्पल येते माझी... आ थू.. दुसरीकडे शमितादेखील अफसानाबद्दल बरेच काही बोलते. ती  तिला घाणेरडी बाई संबोधते.शमिता आणि अफसानामधील वाद आणखी वाढला. विशाल कोटियन देखील शमिताला सपोर्ट करतो. अफसानाचे तिच्या रागावरील नियंत्रण सुटते आणि काच खाली फेकली. ती स्वतःला मारू लागली. अखेर बाकीचे तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात.

टॅग्स :बिग बॉस