Join us  

 राखी सावंतवर का आली दागिने, प्रॉपर्टी विकण्याची वेळ? स्वत: केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 11:29 AM

मला बर्बाद व्हायचे होते म्हणून राजकारणात गेले...

ठळक मुद्देलखनौमध्ये एका वेबसीरिजचे शूटींग सुरु असताना राखीला ‘बिग बॉस 14’मध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली होती. राखीने लगेच ही ऑफर स्वीकारली.

‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत पुन्हा एकदा ‘बिग बॉस 14’ मध्ये दिसणार आहे. आता राखी म्हटल्यावर बिग बॉसच्या घरात  किती धम्माल होणार, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. याच राखीवर गेल्या काही वर्षात  स्वत:चे दागिने आणि प्रापर्टी विकण्याची वेळ आली.होय, अलीकडे खुद्द राखीने याबाबत धक्कादायक खुलासे केलेत.  

राखीने सांगितले, गेली तीन-चार वर्ष माझ्यासाठी अतिशय वाईट राहिलीत. माझ्या खासगी आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या. यामुळे मी कामावर लक्ष देऊ शकली नाही. अनेकांनी माझी फसवणूक केली, अनेकांनी मला लुबाडले. हा काळ इतका खराब होता की, मी कल्पनाही करू शकत नाही. माझ्याकडे पैसे नव्हते. रोजच्या गरजा भागवण्यासाठीही पैसे नसल्याने मला माझे दागिने आणि प्रॉपर्टी विकावी लागली. मी खूप कष्टाने जे काही मिळवले होते, जी काही स्वप्न पूर्ण केली होती, ती स्वप्न विस्कळीत होताना मी बघत होते.बिग बॉस 14 मध्ये आपली ही सर्व कर्मकहाणी सांगणार असल्याचेही राखीने सांगितले. लखनौमध्ये एका वेबसीरिजचे शूटींग सुरु असताना राखीला ‘बिग बॉस 14’मध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली होती. राखीने लगेच ही ऑफर स्वीकारली. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये राखी सावंत दिसली होती आणि हा सीझन तिने गाजवला होता.  

मी खूप बदललेय...मी आताश: खूप बदललेय. नियमित योगामुळे माझा स्वभाव बराच शांत झाला आहे. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमधील राखी आणि आत्ताची राखी यात बरेच अंतर आहे. तरीही बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर काय होते, ते बघू, असेही टाईम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली.

'मंत्र्याचा मुलगा का पकडला जात नाही?', भारतीच्या ड्रग्स कनेक्शनवरून राखी सावंतचा प्रश्न...

मला बर्बाद व्हायचे होते म्हणून राजकारणात गेले...गीदड की मौत आती है तो वह शहर की ओर भागता है. अगदी त्याचप्रमाणे मला बर्बाद व्हायचे होते म्हणून मी राजकारणात आले. आता मला राजकारणात काहीही रस नाही, मला राजकारणात राहायचेच नाही, असे ती म्हणाली. तुम्हाला आठवत असेलच की, राखीने एक राजकीय पक्ष स्थापन केला होता. पण राजकारणात तिला फार यश मिळाले नाही.

टॅग्स :राखी सावंत