Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 13 : आजपासून सुरु होणार ‘बिग बॉस 13’; या गोष्टी असतील खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 13:55 IST

काहीच तासांत ‘बिग बॉस 13’ सुरु होणार आहे. आज 29 सप्टेंबरला रात्री 9 वाजता ‘बिग बॉस 13’चा धमाकेदार शो प्रीमिअर शो प्रसारित होईल. यंदा शोमध्ये इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. सोबत अनेक नव्या गोष्टीही.

ठळक मुद्दे‘बिग बॉस’च्या घराचा प्रत्येक कोपरा खास आहे.

काहीच तासांत ‘बिग बॉस 13’ सुरु होणार आहे. आज 29 सप्टेंबरला रात्री 9 वाजता ‘बिग बॉस 13’चा धमाकेदार शो प्रीमिअर शो प्रसारित होईल. यंदा शोमध्ये इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळणार आहेत. सोबत अनेक नव्या गोष्टीही. बिग बॉसचे यंदाचे 13 वे सीझनही सलमान होस्ट करणार आहे. पण सलमानची होस्टिंग वगळता अनेक नव्या गोष्टी या शोमध्ये पाहायला मिळतील.

‘बिग बॉस’च्या इतिहासात पहिल्यांदा सीझन 13 चा सेट मुंबईस्थित गोरेगावच्या फिल्म सिटीत उभारण्यात आला आहे. यापूर्वी ‘बिग बॉस’च्या सर्व सीझनचे शूट लोणावळा येथे झाले.

* ‘बिग बॉस 13’ची सर्वात खास गोष्ट म्हणजे, यावेळी ‘बिग बॉस’च्या घरात प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाही. ओमंग कुमार यांनी प्लास्टिक न वापरता ‘बिग बॉस’च्या घराला अतिशय कलरफुल लूक दिला आहे.

* ‘बिग बॉस’च्या घरात यावेळी प्रथमच स्पर्धकांना महिलेचा आवाज ऐकायला मिळणार आहे. चर्चा खरी मानाल तर बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल यावेळी पहिल्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरात राहिल. ती यावेळी स्पर्धकांना टास्क देईल. घराची मालकीण म्हणून ती दिसणार आहे.

* यंदाच्या सीझनचे खास वैशिष्ट्य म्हणजे, एका महिन्याच्या आत स्पर्धक फिनालेत आपली जागा पक्की करतील. अर्थात 4 आठवड्यानंतर या सीझनमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळतील आणि यानंतर मेन फिनाले येईल.

* ‘बिग बॉस’च्या 13 व्या सीझनमध्ये केवळ सेलिब्रिटी दिसतील. यापूर्वीच्या काही सीझनमध्ये कॉमनर ‘बिग बॉस’च्या घरात दिसले होते. पण यंदा केवळ सेलिब्रिटी दिसतील.

* नेहमीप्रमाणे हे सीझनही थीम बेस्ड असेल. यावेळी ‘बिग बॉस’च्या घराची थीम म्युझियम आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’चे घर पाहणे  प्रेक्षकांसाठी खास असणार आहे.

* यंदा ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्यांदा ट्रिपल बेड दिसेल. यापूर्वीच्या सर्व सीझनमध्ये सिंगल वा डबल बेड दिसले. आता या ट्रिपल बेडमागे काय रोचक ट्विस्ट आहे, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.

* ‘बिग बॉस13’च्या एका प्रोमोमध्ये एक डॉगी नियम तोडून ‘बिग बॉस’च्या घरात शिरताना दिसला होता. हा डॉगी काय ट्विस्ट घेऊन येतो, हे पाहणे रोचक असणार आहे.

* ‘बिग बॉस’च्या प्रत्येक सीझनमध्ये सलमान नव्या लूकमध्ये दिसतो. कधी तो पायलट बनतो तर कधी शेजारी. यावेळी तो स्टेशन मास्तर आणि शेफ बनला आहे.

* चर्चा खरी मानाल तर ‘बिग बॉस’चे चाहते यावेळी voot सोबतच जियो अ‍ॅपवरही ‘बिग बॉस’चे 13 वे सीझन एन्जॉय करू शकतील.

* ‘बिग बॉस 13’मध्ये प्रथमत: कुठलेही जेल दिसलेले नाही. पण हे एक सरप्राईज असल्याचे ओमंग कुमारने सांगितले आहे. आता हे सरप्राईज काय, हेही इंटरेस्टिंग असणार आहे. 

* ‘बिग बॉस’च्या घराचा प्रत्येक कोपरा खास आहे. या घरात प्रत्येक ठिकाणी ‘बिग बॉस’च्या डोळ्याची प्रतिकृती रेखाटण्यात आली आहे. जेणेकरून ‘बिग बॉस’ची नजर स्पर्धकांवर राहिल.

टॅग्स :बिग बॉससलमान खान