Join us  

OMG! बहुत बडा धमाका होने वाला है...!! हिंदुस्तानी भाऊच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 12:44 PM

बॉलिवूडच्या एका मोठ्या स्टारला एक्सपोज करणार असून त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे सांगून  हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 

ठळक मुद्देहिंदुस्तानी भाऊच्या या पोस्टने तूर्तास सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे. 

बिग बॉस 13’मुळे जबरदस्त हिट झालेला हिंदुस्तानी भाऊ गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटीला सपोर्ट केल्याने तो चर्चेत आला होता. यासाठी त्याने त्याचे टिकटॉक अकाऊंटही डिलीट केले होते. त्याच्या या अकाऊंटवर तब्बल 15 लाख  फॉलोअर्स होते. आता हिंदुस्तानी भाऊ एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. होय, लवकरच बॉलिवूडच्या एका मोठ्या स्टारला एक्सपोज करणार असून त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे सांगून  हिंदुस्तानी भाऊने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 

 ‘कल बहुत बडा धमाका होने वाला है. हमारे बॉलिवूड का जाना-माना चेहरा, उसको बेनकाब करने वाला हूं... कल उसके खिलाफ एफआयआर करने वाला हूं. अब पहले अपने देश के गद्दारों को साफ करना है,’ अशी पोस्ट हिंदुस्तानी भाऊने लिहिली होती.विशेष म्हणजे आपल्या या पोस्टमध्ये हिंदुस्तानी भाऊने पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदित्य ठाकरे, मुंबई पोलिस इतकेच नाही तर इंडियन आर्मीला टॅग केले होते.

हिंदुस्तानी भाऊच्या या पोस्टने तूर्तास सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे. अखेर भाऊ बॉलिवूडच्या कोणत्या स्टारला एक्स्पोज करतो आणि का? तो कोणत्या स्टारबद्दल बोलतोय, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहे. तूर्तास हिंदुस्तानी भाऊ एफआयआर दाखल करण्यासाठी पोहोचला आहे. थोड्याच वेळात या प्रकरणाचे सविस्तर अपडेट कळतीलच.

टॅग्स :बिग बॉस