Join us  

Bigg Boss 13 : बिग बॉस 13 या कार्यक्रमात हे सेलिब्रेटी करणार प्रेक्षकांचे मनोरंजन, वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 3:32 PM

बिग बॉस 13 च्या पहिल्या भागात सलमानने त्याच्या अंदाजात कार्यक्रमातील स्पर्धकांचे स्वागत केले.

ठळक मुद्देकोएनाला साकी गर्ल म्हणून ओळखले जाते. तिने मुसाफिर, अपन सपना मनी मनी यांसारख्या चित्रपटात काम केले होते. मुसाफिर या चित्रपटातील साकी साकी या गाण्यामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 

सलमान खानचा 'बिग बॉस 13' हा प्रसिद्ध रिॲलिटी शो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या कार्यक्रमाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. बिग बॉस १३ चा पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून या कार्यक्रमात कोण कोण स्पर्धक हजेरी लावणार याचा अंदाज लावला जात होता. या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रेक्षकांना काल पाहायला मिळाला. यामध्ये सलमानने त्याच्या अंदाजात कार्यक्रमातील स्पर्धकांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमामधील नवीन नियमांविषयी सांगितले. तसेच सलमान आणि या कार्यक्रमातील स्पर्धकांचा धमाकेदार पराफॉर्मन्स यात प्रेक्षकांना पाहायला मिळाला. वाचा संपूर्ण लिस्ट...

देवोलिना भट्टाचार्जीदेवोलिनाने साथ निभाना साथिया या मालिकेत गोपी बहू ही भूमिका साकारली होती. या कार्यक्रमातील तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती.

रश्मी देसाईरश्मी देसोईला उतरण या मालिकेतील तपस्या या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. ती बिग बॉसच्या घरात दिल से दिल तक या कार्यक्रमातील तिचे सहकलाकार सिद्धार्थ शुक्ला आणि आरती सिंग यांच्यासोबत दिसत आहे. सिद्धार्थ आणि रश्मी नात्यात असल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये रंगली होती.

सिद्धार्थ शुक्लासिद्धार्थने बालिकावधू या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. तसेच तो खतरों के खिलाडीमध्ये देखील झळकला होता. दिल से दिल तक या कार्यक्रमात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण त्याला काही कारणास्तव या मालिकेतून काढण्यात आले होते.

शेहनाझ गिलशहनाझ ही प्रसिद्ध गायक, मॉडेल आणि अभिनेत्री असून तिचे अनेक सिंगल्स रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. 

पारस छाब्रापारसने बडो बहू, द सिरियर, हमारी अधुरी कहानी, कर्णसंगिनी यांसारख्या अनेक मालिकेत काम केले होते. विघ्नहर्ता गणेश या मालिकेत त्याने रावणाची भूमिका साकारली होती. तो अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत नात्यात आहे.

कोएना मित्राकोएनाला साकी गर्ल म्हणून ओळखले जाते. तिने मुसाफिर, अपन सपना मनी मनी यांसारख्या चित्रपटात काम केले होते. मुसाफिर या चित्रपटातील साकी साकी या गाण्यामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 

दलजीत कौरदलजीतने कुलवधू, इस प्यार को क्या नाम दू, काला टीका या मालिकेत काम केले आहे. ती सध्या गुडान या मालिकेत काम करत होती. पण बिग बॉससाठी तिने ही मालिका सोडली. तिचा मुलगा जयदन हा केवळ पाच वर्षांचा असून ती बिग बॉसच्या घरात असताना तो दलजीतच्या आई वडिलांसोबत राहाणार आहे. दलजीतचा पूर्व पती शलीन भनोट या कार्यक्रमाचा भाग नाही आहे ना याविषयी तिने हा कार्यक्रम साईन करण्यापूर्वीच विचारले होते असे म्हटले जाते. 

सिद्धार्थ डेसिद्धार्थ डे हा एक लेखक असून त्याने बिग बॉसच्या पहिल्या सिझनमधील काही एपिसोड लिहिले आहेत. शाहरुख खानच्या एका कार्यक्रमामुळे त्याला ओळख मिळाली. त्यामुळे तो त्याच्या यशात शाहरुख खानचा मोठा हात असल्याचे मानतो. 

आरती सिंगआरती ही अभिनेता गोविंदाची भाची असून कृष्णा अभिषेकची बहीण आहे. तिने उडाण, वारीस या मालिकांमध्ये काम केले आहे. 

आसिम रियाजआसिम हा प्रसिद्ध मॉडेल असून त्याच्या हॉट लूक्ससाठी तो ओळखला जातो.

अबू मलिकअबू हा अनू मलिकचा लहान भाऊ असून तो एक लेखक देखील आहे. तसेच तो बॉलिवूड गायकांचे अनेक लाईव्ह शो देखील आयोजित करतो. 

शेफाली बग्गाशेफाली ही मीडिया पर्सनॅलिटी असून तिने काही इव्हेंटदेखील होस्ट केले आहेत. शेफाली ही मुळची दिल्लीची असून तिने जर्नालिझम केले आहे. 

माहिरा शर्मामाहिराने नागिन 3 मध्ये काम केले होते. ती मुळची जम्मू काश्मीरची असून तिने पार्टनर्स ट्रबल हो गयी डबल, तारक मेहता का उल्टा चष्मा, कुंडली भाग्य यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

टॅग्स :बिग बॉस