Join us  

Bigg Boss 13: आसिम रियाजचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी, चॅनलला बॉयकॉट करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 12:54 PM

 आसिम रियाजला कडवी झुंज देत सिद्धार्थने  ‘बिग बॉस 13’च्या ट्रॉफीवर नाव कोरले. सिद्धार्थचे चाहते यामुळे आनंदात आहे. पण आसिमच्या चाहत्यांना मात्र दु:ख अनावर होतेय.

ठळक मुद्दे‘बिग बॉस शो स्क्रिप्टेड होता. पण खरा विनर तूच आहेस आसिम,’ असे एका युजरने लिहिले.

अखेर सिद्धार्थ शुक्लाने ‘बिग बॉस 13’ची ट्रॉफी जिंकली.  आसिम रियाजला कडवी झुंज देत सिद्धार्थने  ‘बिग बॉस 13’च्या ट्रॉफीवर नाव कोरले. सिद्धार्थचे चाहते यामुळे आनंदात आहे. पण आसिमच्या चाहत्यांना मात्र दु:ख अनावर होतेय. होय, आसिमच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आपले दु:ख आणि संताप दोन्हीही व्यक्त केले आहे.सिद्धार्थ जिंकूनही ट्रोल होतोय. याऊलट आसिम हरूनही लोकांच्या नजरेत ‘हिरो’ ठरला आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच आसिमच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड वाढ झाली. याच चाहत्यांना आता आसिमची हार पत्करणे जड जातेय. काही आसिमच्या पराभवामुळे निराश आहेत तर काहींनी बिग बॉस हा शो फिक्स्ड असल्याचा आरोप केला आहे.

बिग बॉसच्या माजी स्पर्धक रोमिल चौधरी आसिमचा सर्वात मोठा चाहता म्हणून समोर आला. आसिमच्या पराभवानंतर त्याने केलेल्या टिष्ट्वटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘कोई बात नहीं भाई, परेशान मत हो. मेरे साथ मी पिछले सीजन में कुछ ऐसा ही हुआ था. अपने टाइम मैं इसलिए खुश था क्योंकि जनता का विनर मैं था. उसी तरह से तुम भी जनता के विनर हो. हमे चॅनल का नहीं जनता का दिल जीतना होता है, और तुमने ऐसा ही कर दिखाया है,’ असे ट्वीट रोमिलने केले.

रोमिलच्या या ट्वीटनंतर  आसिमचे समर्थन करणा-या पोस्टचा जणू पूर आला. ‘यालाच म्हणतात जनतेचा विजेता,’असे एका युजरने लिहिले. अनेक युजर्सनी बिग बॉस शो फिक्स्ड होता, असा आरोप केला. ‘बिग बॉस शो स्क्रिप्टेड होता. पण खरा विनर तूच आहेस आसिम,’ असे एका युजरने लिहिले. आसिमच्या अनेक चाहत्यांनी  आसिमला डावलण्यात आल्याचा आरोप करत, कलर्स वाहिनीला बायकॉट करण्याची धमकी दिली.

टॅग्स :बिग बॉसआसिम रियाज