Join us  

Bigg boss 12 : बिग बॉसच्या स्पर्धकांनी पाळले नाहीत बिग बॉसचे हे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:57 PM

बिग बॉसच्या घरात राहाणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला काही नियम पाळणे गरजेचे असते. पण या घरातील अनेकांनी बिग बॉसचे नियम तोडले आहेत आणि त्यामुळे बिग बॉस त्यांना त्यांनी घराच्या नियमांचे पालन कशाप्रकारे केले नाही हे क्लिपिंगच्या माध्यमातून दाखवणार आहेत.

बिग बॉस हाऊसमध्ये नियम तोडण्यामुळे स्पर्धकांना शिक्षा होणार आहे. बिग बॉसच्या विकेंडच्या वार दरम्यान कोणताही वाद झाला नाही, त्यामुळे बिग बॉस हाऊसमध्ये स्पर्धकांना आणखी एक आठवडा शांती मिळाली आहे. मात्र घरातील स्पर्धक नाट्यमय रित्या वावरत असल्याचे सगळ्यांनाच दिसून येत आहे. बिग बॉसने 'टिप टिप बरसा पाणी' हे गाणे ऐकवून सर्वांना सकाळी झोपेतून उठवले. या गाण्यानंतर बिग बॉसच्या घरातील कप्तान कृतीने शिवाशिशला धक्का देऊन पूलमध्ये पाडले. त्यावेळी त्याने माइक घातला असल्याने माईक सोबतच तो पाण्यात पडला.

बिग बॉसच्या घरात राहाणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला काही नियम पाळणे गरजेचे असते. पण या घरातील अनेकांनी बिग बॉसचे नियम तोडले आहेत आणि त्यामुळे बिग बॉस त्यांना त्यांनी घराच्या नियमांचे पालन कशाप्रकारे केले नाही हे क्लिपिंगच्या माध्यमातून दाखवणार आहेत. उदाहरणार्थ, इंग्रजीत बोलणे, माईक न घालणे, दिवसात झोपणे यांसारख्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे घराच्या कॅप्टननेदेखील नियमांचे पालन केलेले नाही. बिग बॉसकडून नियमांचे उल्लंघन केल्याचे जाहीर होईपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेतला. पण ही क्लिपिंग संपल्यानंतर बिग बॉसने नामांकनातून सुरक्षित राहणाऱ्या कर्णधारांपासून विशेषाधिकारही काढून घेतला. खान बहिणी कर्णधारांसह विशेषत: क्रितीशी यावरून भांडल्या. कारण कप्तान म्हणून कृतीची निवड झाल्यामुळे त्या नाखुश होत्या.

आठवडा सुरू होण्याआधी दुसऱ्या फेरीच्या नॉमिनेशनसाठी उमेदवारांनी प्रतीक्षा केली आणि बिग बॉसने देखील खुली नामांकनं जाहीर केली. टास्कचा एक भाग म्हणून, प्रतिस्पर्धींना जोडी किंवा सिंगल्सना नामांकित करायला सांगितले. त्याचसोबत तुम्ही त्यांचे नामांकन का करत आहात याचे कारण देखील द्यायचे असे सांगितले. बिग बॉसने क्रिती आणि रोशमी यांना विशेष शक्ती दिली ज्यामुळे ते एक स्पर्धक वाचवू शकले.

रोमल - निर्मल आणि करणवीर आधीच नामांकन यादीत आहेत, या आठवड्यातील बेकायदेशीर कारवाईसाठी इतर स्पर्धक त्यांच्यात सामील होतील काय? हे प्रेक्षकांना बिग बॉसच्या या भागात पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :बिग बॉस 12