Join us  

Bigg Boss 12 : काय म्हणता; अनूप जलोटा व जसलीन मथारूचे ब्रेकअप??

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 12:07 PM

अनुप जलोटा आणि जसलीन मथारू या  जोडीने ‘बिग बॉस 12’च्या घरात एन्ट्री घेतली तेव्हापासून ही जोडी चर्चेत आहे. आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत, असे नॅशनल टीव्हीवर जाहिर करून या जोडीने खळबळ उडवली होती.

अनुप जलोटा आणि जसलीन मथारू या  जोडीने ‘बिग बॉस 12’च्या घरात एन्ट्री घेतली तेव्हापासून ही जोडी चर्चेत आहे. आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत, असे नॅशनल टीव्हीवर जाहिर करून या जोडीने खळबळ उडवली होती. पण ‘बिग बॉस 12’च्या घरात जाताच, या जोडीच्या नात्याला जणू दृष्ट लागलीय. होय, आत्तापर्यंत ‘बिग बॉस 12’घरात अनूप व जसलीनचा हसत-खेळत प्रवास सुरु होता. पण काल झालेल्या एका नॉमिनेशन टास्कने या जोडीच्या नात्यात कायमचा दुरावा निमाण केला. काल झालेल्या या नॉमिनेशन टास्कमध्ये एक सिंगल कंटेस्टंट कुण्या एका जोडीदाराला जायबंदी करणार होता. त्याला सोडवण्यासाठी त्याच्या जोडीदाराला सिंगल कंटेस्टंट सांगेल त्या वस्तूचा त्याग करणे बंधनकारक होते. या टास्कमध्ये दीपिका कक्कडने अनूप जलोटा यांनी बंदी बनवले.  यानंतर दीपिकाने अनूप यांच्या सुटकेच्या बदल्यात त्यांची जोडीदार जसलीनला तिचे सगळे कपडे, मेकअप त्याग करण्यास तसेच केस कापण्यास सांगितले. आधी जसलीनने हे सगळे करण्यास होकार दिला. नंतर नंतर ती पलटली. एक कलाकार या नात्याने कपडे किती महत्त्वाचे आहेत, हे तिने दीपिकाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दीपिका आपल्या म्हणण्यावर ठाम होती. अखेर जसलीनने कपड्यांचा त्याग करण्यास व केस कापण्यास नकार दिला, झाले, हीच गोष्ट अनूप यांच्या मनाला लागली. तू माझ्यासाठी कपड्यांचा त्याग करू शकत नाहीस? असा प्रश्न त्यांनी जसलीनला केला़ पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

या नाट्यमय घडामोडीनंतरचा ‘बिग बॉस 12’च्या घरातील एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनूप जसलीनसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय जाहिर करत आहेत. ‘मी घरातील सगळ्या सदस्यांसमोर सांगू इच्छितो की, काल जसलीनने जो टास्क खेळला त्याने मी खूप दुखावला़े गेलो आहे.  किमान कपडे त्याग करण्याची तयारी दर्शवणे, एवढे तरी प्रेम सिद्ध करण्यासाठी तिने करणे अपेक्षित होते. पण तिला तिचे कपडे, मेकअप, केस यावर अधिक प्रेम होते. त्यामुळे मी ही जोडी तोडतोय. आता मी या खेळात एकटा आहे,’असे अनूप जलोटा या व्हिडिओत म्हणताहेत.

टॅग्स :बिग बॉस 12अनुप जलोटाजसलीन मथारू