Join us  

Bigg Boss 12: अनूप जलोटा आणि जसलीन मथारूच्या नात्याविषयी जसलीनच्या वडिलांनी दिली ही शॉकिंग प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 2:16 PM

अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. ही गोष्ट ऐकल्यानंतर सामान्य लोकांना तर शॉक लागला आहे. पण त्याचसोबत जसलीनच्या पालकांना देखील या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला आहे.

बिग बॉस 12’च्या घरातील सर्वाधिक चर्चा आहे ती एका जोडीची. होय, ही जोडी आहे, भजनसम्राट अनूप जलोटा आणि त्यांची गर्लफ्रेन्ड जसलीन मथारू यांची. ६५ वर्षांचे अनूप जलोटा गेल्या तीन वर्षांपासून स्वत:पेक्षा ३७ वर्षांनी लहान जसलीनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. खुद्द अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. ही गोष्ट ऐकल्यानंतर सामान्य लोकांना तर शॉक लागला आहे. पण त्याचसोबत जसलीनच्या पालकांना देखील या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला आहे.

जसलीनच्या वडिलांनी आज तक या वाहिनीशी बोलताना सांगितले आहे की, मी त्या दोघांच्या नात्याला कधीच संमती देऊ शकत नाही की मी माझे आशीर्वाद त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळे मी त्यांच्यापासून दूर राहाणेच पसंत करेन. मी काही वर्षांपूर्वी जसलीनची अनूप यांच्याशी ओळख करून दिली होती. तिच्या गायनाचे कौशल्य सुधारण्यात ते तिला मदत करतील असे आम्हाला वाटले होते. पण त्यांच्यात काही सुरू आहे याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. ते बिग बॉस या कार्यक्रमात हजेरी लावणार याबद्दल जसलीनने आम्हाला सांगितले होते. पण ते दोघे गुरू-शिष्य म्हणून कार्यक्रमात सामील होणार असे सांगण्यात आले होते. पण कार्यक्रमात दाखल होण्यापूर्वी नॅशनल टिव्हीवर त्यांनी सगळ्यांना जी गोष्ट सांगितली, ती ऐकून आम्हाला धक्काच बसला. आमच्या संपूर्ण कुटुंबालाच या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. आम्हाला सगळ्यांना या गोष्टीचा प्रचंड संताप आला आहे. 

जसलीनने बिग बॉस 12 च्या घरात प्रवेश करताना सांगितले होते की, ती गेल्या तीन वर्षांपासून अनूप यांना डेट करतेय. इतकी वर्षे त्यांनी ही रिलेशनशिप जगाच्या नजरेपासून लपवून ठेवली होती. अनूप आणि जसलीन यांनी ही गोष्ट कबूल केली असली तरी प्रेक्षकांनाच नाही तर ‘बिग बॉस12’च्या स्पर्धकांनाही अनुप आणि जसलीन कपल असल्याची गोष्ट पचवता आलेली नाही. ‘बिग बॉस12’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये घरातील अनेक स्पर्धक अनुप आणि जसलीन यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले होते. 

टॅग्स :बिग बॉस 12अनुप जलोटाजसलीन मथारू