Join us

Bigg Boss 11 Day 2: 'भाभीजी घर पर हैं' फेम शिल्पा शिंदेला घरात का कोसळलं रडू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 11:22 IST

छोट्या पडद्यावर बिग बॉस सीझन 11चं मोठ्या दणक्यात आगमन झाले आहे. शोच्या पहिल्या आठवड्यापासूनच बिग बॉस रसिकांना शोच्या माध्यमातून ...

छोट्या पडद्यावर बिग बॉस सीझन 11चं मोठ्या दणक्यात आगमन झाले आहे. शोच्या पहिल्या आठवड्यापासूनच बिग बॉस रसिकांना शोच्या माध्यमातून मनोरंजनाचा मसाला पाहायला मिळतोय. अकराव्या सीझनच्या पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात तुफान वादाला सुरुवात झालीय. भाभीजी घर पर हैं फेम मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि याच मालिकेचा निर्माता विकास गुप्ता हे बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून दाखल झाले आहेत. शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यात भाभीजी घर पर है ही मालिका सुरु असताना वाद रंगला होता. शिल्पाने निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. शिल्पाने एक्झिट नाही तर तिला काढून टाकण्यात आल्याचंही बोललं जातंय. शिल्पा आणि विकासच्या या वादाची पार्श्वभूमी पाहता बिग बॉस शोला टीआरपी मिळवून देण्याच्या उद्देशाने हे दोघेही बिग बॉसच्या घरात दाखल झाले आहेत. पहिल्याच दिवसापासून दोघांमध्ये कलगीतुरा रंगण्यास सुरुवात झाली आहे.'भाभीजी घर पर है' या मालिकेतून बाहेर पडल्याची सल आणि राग अजूनही शिल्पाच्या मनात कायम आहे. त्यामुळेच त्यावेळी काय घडलं हे सांगण्याची हीच संधी असल्याचं जणू शिल्पाला वाटतं आहे. या मालिकेतून बाहेर पडण्याला विकास कसा जबाबदार आहे याची पोलखोल शिल्पा बिग बॉसच्या माध्यमातून करु लागली आहे. आपली करुण कहानी सांगून सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप शिल्पाकडून सुरु असल्याचंच पाहायला मिळतं आहे. इतकंच नाही तर बिग बॉसच्या कॅमे-यांची नजर आपल्यावरच कशी राहिल याची खबरदारीही ती घेत आहे. विनाकारण विविध पद्धतीने पोझ करुन कॅमे-याच्या आणि घरातील सदस्यांच्या नजरा आकर्षित करण्याचा प्रयत्न शिल्पाकडून सुरु आहे. शिल्पाच्या या मुद्दाम करण्यात येणा-या हरकती ना बिग बॉसच्या कॅमे-यापासून लपल्या आहेत ना घरातील सदस्यांपासून काही लपून राहिलं आहे. त्यामुळेच शिल्पाला धडा शिकवण्याचं त्यांनी ठरवलेलं दिसतं आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्याच्या इव्हिक्शनमध्ये शिल्पाला नॉमिनेट करण्यात आलं आहे. घरातील बहुतांशी सर्वच स्पर्धकांनी पहिल्या इव्हिक्शनसाठी शिल्पालाच नॉमिनेट केले आहे. त्यामुळे घरातील आपल्या सदस्यांच्या अशा वागण्यानं शिल्पालाही धक्का बसला आहे. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अंगलट आल्याचं बहुदा शिल्पाला जाणवलं असावं. त्यामुळे नॉमिनेशननंतर आपलं नाव ऐकून धक्का बसलेल्या शिल्पाला अश्रू अनावर झाले. पहिल्याच आठवड्यातील इव्हिक्शन नॉमिनेशनमध्ये नाव आल्यानंतर शिल्पाला रडूच कोसळले. आता शिल्पाला खरोखरच रडू कोसळले की हासुद्धा तिचा रसिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न तर नाही ना अशा चर्चा बिग बॉसच्या घरात आणि रसिकांमध्ये रंगल्या आहेत.        Also Read:Bigg Boss11: कोणता स्पर्धक ठरला पहिल्या सिझनपासून ते दहाव्या सिझनपर्यंतचा सगळ्यात वादग्रस्त,वाचा सविस्तर