Bigg Boss 10: 'नीतवीर' म्हणून ओळखली जाते ही जोडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 11:55 IST
नितीभा आणि मनवीर नाहीतर 'नीतवीर' म्हणून ओळखली जाते ही जोडी. बिग बॉस 10 च्या पर्वात कॉमनर्स म्हणून एंट्री मारलेल्या ...
Bigg Boss 10: 'नीतवीर' म्हणून ओळखली जाते ही जोडी?
नितीभा आणि मनवीर नाहीतर 'नीतवीर' म्हणून ओळखली जाते ही जोडी. बिग बॉस 10च्या पर्वात कॉमनर्स म्हणून एंट्री मारलेल्या मनु गु्जर आणि नितीभा कौल दोघांमध्ये एकमेकांशी शोच्या सुरूवातीला जवळीक नव्हती. त्यात मनवीर हा देसी मुंडा तर गुगल गर्ल नितीभा ही देसी गर्ल असूनही सेलिब्रेटी असल्यासारखीच घरात वावरताना दिसली. मात्र जसजसा मनवीर लोकप्रिय होत गेला नितीभाने आपला मोर्चा मनवीरकडे वळवला. मनवीरसह मैत्री करत तिने रसिकांचे व्होटही मिळवले. त्यानंतर दोघांचा रोमँटीक अंदाजही घरात पाहायला मिळाला. आता नितीभा ही बिग बॉसच्या घरात नसली तरीही मनवीरचे नितीभाशी नाव जोडले जात असल्याचे खुद्द नितीभाने म्हटले आहे. इतकेच नाहीतर मनवीरचे चाहते नितीभाला 'भाभी' म्हणून बोलवू लागले आहेत असेही नितीभाने म्हटले आहे.ALSO READ:बिग बॉसच्या घरात 'या' जोडीची सुरू झाली लव्हस्टोरी? गेल्या भागात नितीभाने बिग बॉसच्या घरात काही वेळेसाठी एंट्री मारली होती. त्यावेळी तिने बिग बॉसशोमधून तिचे आयुष्य खूप बदलले असल्याचे स्पर्धकांना सांगितले.इतकेच नाहीतर मनवीर आणि नितीभा ही जोडी रसिकांना आवडते. त्यामुळे पुढे शो संपल्यानंतर मनवीर आणि नितीभा यांनी लग्न करावे. बिग बॉसच्या घराप्रमाणेच बाहेर त्यांच्या खाजगी आयुष्यात एकत्र राहावे असे नितीभाच्या कुटुंबाला वाटत असल्याचे नितीभाने म्हटले आहे. त्यामुळे गुगल गर्ल नितीभा मनवीरच्या प्रेमात पडल्याचे तिने बोलताना सांगितले. मनवीरला बिग बॉस 10 शोचा स्पर्धक म्हणून नाहीतर विजेता म्हणून पाहायचे आहे अशी इच्छाही नितीभाने मनवीरला बोलून दाखवली. त्यामुळे ऑनस्क्रीन दिसणारी ही रोमँटीक जोडी त्यांच्या खाजगी आयुष्यात काय कमाल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.