Join us

बिग बॉस : स्वामी ओमचा पुन्हा राडा; बिग बॉसने दाखविला बाहेरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 15:47 IST

बिग बॉसच्या घरातील आतापर्यंतचा सर्वाधिक वादग्रस्त कंटेस्टेंट ठरलेले स्वयंघोषित बाबा स्वामी ओम यांना जेव्हा जेव्हा बिग बॉस तसेच सलमान ...

बिग बॉसच्या घरातील आतापर्यंतचा सर्वाधिक वादग्रस्त कंटेस्टेंट ठरलेले स्वयंघोषित बाबा स्वामी ओम यांना जेव्हा जेव्हा बिग बॉस तसेच सलमान खानने फटकारले तेव्हा तेव्हा त्यांच्यात राडा करण्यासाठी जणू काही उत्साहच संचारला. प्रत्येक आठवड्यात काही तरी विचित्र कारनामा करून घरातील इतरांना सळो की पळो करणाºया स्वामी ओमने यावेळेस असा काही उपद््व्याप केला की, ज्यामुळे बिग बॉसला त्यांची घरातून हकालपट्टीच करावी लागली. प्रियंका जग्गानंतर नॉमिनेट न होताच घरातून हकालपट्टी केलेले स्वामी ओम दुसरे कंटेस्टेंट ठरले आहेत.}}}} ">http://शोच्या सुरुवातीपासूनच स्वामी ओम यांचे घरातील वावरणे विक्षिप्त होते. वास्तविक शोच्या सुरुवातीलाच घरातील सर्वाधिक ज्येष्ठ व्यक्ती आणि धार्मिक क्षेत्राशी संबंधित असल्याने त्यांच्याकडे आदराने बघितले जात होते. मात्र त्यांच्या अंगी असलेल्या राडेबाज गुणांमुळे ते घरातील खलनायक ठरले. प्रत्येक आठवड्यात तसेच टास्कमध्ये खोडा घालून इतरांना हैराण करण्याचा जणू काही त्यांनी विडाच उचलला होता. कधी घरातील तरुणींसमोर चड्डी काढून, तर कधी किचनमध्ये लघुशंका करून त्यांनी त्यांच्यातील विक्षिप्त व्यक्तीचे दर्शन घडवून दिले. त्यांच्या या कारनाम्यांमुळे बिग बॉसने त्यांना वारंवार फटकारले. तसेच सलमान खान याच्या ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमध्ये ते हमखास सलमानच्या रडारवर असायचे. अशातही त्यांच्यातील चांगुलपणा कधीच दिसला नाही. यावेळेस तर त्यांनी सर्व मर्यादा पार करून अतिशय गलिच्छ खेळ खेळल्याने बिग बॉसला घरातून त्यांची हकालपट्टी करावी लागली. }}}} त्याचे झाले असे की, घरात कॅप्टंशिपसाठी स्वामी ओम आणि बानी जे यांच्यात टास्क खेळविण्यात आला. टास्कनुसार घरातील गार्डन एरियामध्ये दोन टेबलवर स्वामी ओम आणि बानी जे यांच्या नावाचे पिरॅमिड्स बनविण्यात आले होते. इतर सदस्यांना बॉलच्या साहाय्याने हे पिरॅमिड्स पाडायचे असतात. ज्या सदस्याचे पिरॅमिड्स अधिकाधिक उरतील तोच या टास्कचा विनर आणि घरातील कॅप्टन होणार होता. त्यानुसार रोहन मेहरा याने स्वामी ओम यांचे पिरॅमिड्स पाडण्यास सुरुवात केली. मात्र मध्येच अडथळा आणण्यासाठी स्वामी ओम वाटेल ते प्रयत्न करीत होते. अखेर त्यांनी एका भांड्यात स्वत:ची लंघुशंका आणून रोहन मेहरा आणि बानी जे यांच्या तोंडावर फेकली. }}}} ">http://स्वामी ओमचे हे कृत्य सर्वांनाच चीड आणणारे असल्याने संतापलेल्या इतर कंटेस्टेंटनी त्यांना धक्के देत जेलमध्ये टाकले. यावेळेस रोहन मेहरा जबरदस्त संतापलेला असल्याचे बघावयास मिळाले. त्याने स्वामी ओमला कवेत पकडून जेलमध्ये फेकले. तसेच त्यांच्या दिशेने लाथाही भिरकावल्या. संतापलेल्या बानीने तर आरडाओरड करीत त्यांच्या दिशेने पाण्याने भरलेले भांडे फेकले. नेहमीच स्वामी ओमची बाजू घेणाºया मनवीर गुर्जर आणि मनू पंजाबी हेदेखील स्वामी ओमच्या या प्रतापामुळे संतापून गेले. मात्र स्वामी ओमला त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला नसल्याचे बघावयास मिळत होते. नेहमीप्रमाणेच ते घरातील कॅमेºयांसमोर बिग बॉसकडे इतरांची तक्रार करताना बघावयास मिळाले. मला सगळ्यांनी मारहाण केली, असे ते बिग बॉसला सांगत होते. मात्र स्वामी ओमने केलेले कृत्य अजिबात दयेच्या पात्र नसल्याने बिग बॉसने त्यांची थेट घरातून हकालपट्टी केली. बिग बॉस आपले काहीच करू शकणार नाही, या आविर्भावात वावरणाºया स्वामी ओमची हकलापट्टी मात्र घरातील इतरांसाठी दिलासादायक ठरली. }}}} ">http://प्रियंका जग्गानंतर घरातून थेट हकालपट्टी करणाºयांमध्ये स्वामी ओम यांचे नाव अपेक्षित होते. दरम्यान, यापूर्वीही स्वामी ओमच्या अशा वागण्यांसाठी बिग बॉसने त्यांना वारंवार चेतावणी दिली होती. काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांनी घरातील किचनमध्ये लघुशंका केली होती, तेव्हा बिग बॉस त्यांच्यावर चांगलेच संतापले होते. नॅशनल टीव्हीवर अशी गलिच्छा वर्तवणूक करून तुम्ही काय सिद्ध करू इच्छिता, याला तुम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन म्हणताय का? अशा शब्दात खडेबोल सुनावले होते. सलमानने तर प्रत्येक एपिसोडमध्ये स्वामी ओमचा पानउतारा केला होता. जर त्यांनी त्यांची बेशिस्त वागणूक बंद केली नाही तर बिग बॉसची एक्स कंटेस्टंट प्रियंका जग्गाप्रमाणे त्याचीही हकालपट्टी करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. मात्र स्वामी ओमने या बिग बॉस आणि सलमानच्या इशाºयांना कधीच गांभीर्याने घेतले नसल्याने त्यांची हकालपट्टी करावी लागली.