Join us  

बिग बॉस मराठीचे बिनधास्त सदस्य पहिल्यांदाच करणार बेधडक खुलासे !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 5:16 PM

कलर्स मराठी या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीने बिग बॉस या कार्यक्रमाचे मराठमोळ रूपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले होते. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारत आहेत. किशोर चौघुले, प्राजक्ता हनमघर, भूषण कडू, ओंकार भोजने हे काही इरसाल पात्र या कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढवत आहेत. या लोकप्रिय मंडळींची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळत आहे. कलर्स मराठी या महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीने बिग बॉस या कार्यक्रमाचे मराठमोळ रूपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले होते. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, भरपूर प्रेमं दिले. कार्यक्रम सुरु होताच प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळविण्यास सुरुवात केली होती. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. याच पहिल्यावहिल्या पर्वाची पहिली विजेती मेघा धाडे, तसेच उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस, सई लोकूर, स्मिता गोंदकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये बिग बॉसच्या या बिनधास्त सदस्यांनी पहिल्यांदाच बेधडक खुलासे केले आहेत.

 

कार्यक्रमामध्ये गप्पा आणि गोष्टीबरोबर अनेक प्रश्न देखील विचारण्यात आले ज्याची उत्तर यांनी दिली आहेत. जसे मेघा धाडेला मकरंद यांनी विचारले कि तू बिग बॉसच्या वेळेस मत मॅनेज केली होती ? हे खरे आहे का ? तसेच उषा नाडकर्णी यांना विचारले तुमच्या फटकळ स्वभावाने बरेच दुखावले जात असतील तुम्हाला हे मान्य आहे का ? सईला बिग बॉसच्या प्रवासामध्ये कोणा ना कोणाची तरी साथ वा आधार लागला त्याशिवाय ती पुढे नाही जाऊ शकली असं प्रेक्षकांना वाटत होत... असं का घडलं ? बिग बॉस मध्ये टिकून राहण्यासाठी बिकीनिचा आधार स्मिता तुला का घ्यावासा वाटला ? याबद्दल काय सांगशील ? या प्रश्नांची उत्तरं हे सदस्य काय देतील ? काय सांगतील ? हे तुम्हाला या आठवड्या मध्ये बघायला मिळणार आहे. तसेच या सदस्यांसोबत गाणी ओळखण्याचा खेळ देखील खेळण्यात आला. ज्यावेळेस सईने मकरंद अनासपुरे यांसोबत डान्स केला.

 

याबरोबरच मेघाने तिची मुंबईमधील प्रवासाची गोष्ट आणि वेगवेगळे अनुभव सांगितले. सईने राजेश श्रुंगारपूरे याबद्दल एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट सांगितली आहे तर मेघाने किशोर चौघुले यांबाबत सांगितले. या भाग बघायला आणि या बेधडक सदस्यांबद्दल जाणून घ्यायला नक्कीच मज्जा येणार आहे. या पाच जणींना एक छानशी भेट देखील देण्यात आली. त्याचबरोबर या सदस्यांसाठी त्यांच्या जवळच्या व्यक्तीने एक छोटासा मेसेज दिला ज्यामध्ये मेघासाठी पंढरीनाथ कांबळी तर सईसाठी तिची आई वीणा लोकूर, रेशमसाठी हर्षदा खानविलकर, उषा ताईसाठी अलका कुबल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :मकरंद अनासपुरेमेघा धाडेस्मिता गोंदकररेशम टिपणीस