Join us

Big Boss Marathi 3 : विशाल निकमची ‘सौंदर्या’ आहे तरी कोण? अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय एकच प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 08:00 IST

Big Boss Marathi 3  : ‘बिग बॉस मराठी 3’मधला डॅशिंग, हँडसम चेहरा कोण? तर सध्या तरी एकच चेहरा डोळ्यापुढं येतो. तरूणींमध्येही त्याची मोठी क्रेझ आहे. पण तूर्तास चर्चा विशालची नाही तर  ‘सौंदर्या’ची आहे.

बिग बॉस मराठी 3’मधला (Big Boss Marathi 3) डॅशिंग, हँडसम चेहरा कोण? तर सध्या तरी एकच चेहरा डोळ्यापुढं येतो. तो म्हणजे विशाल निकमचा (Vishal Nikam). होय, विशाल ‘बिग बॉस मराठी 3’च्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. सिक्स पॅक अ‍ॅब्जमुळे तरूणींमध्येही त्याची मोठी क्रेझ आहे. पण तूर्तास चर्चा विशालची नाही तर  ‘सौंदर्या’ची आहे.होय, विशालची ‘सौंदर्या’ कोण हा प्रश्न सध्या अख्ख्या महाराष्ट्राला पडला आहे.या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी 3’च्या घरात फॅमिली वीक साजरा झाला आणि यादरम्यान विशालच्या ‘सौंदर्या’ची चर्चा सुरु झाली. होय,  आई आणि धाकटी बहीण बिग बॉसच्या घरात विशालला भेटायला आली. आईला पाहून विशाल प्रचंड भावुक झाला. मध्ये काच होती, पण आई काचेपलीकडे येताच, विशालनं तिला वाकून नमस्कार करत तिचा आशीर्वाद घेतला. क्षणभर माऊलीही स्तब्ध झाली.

चिडू नकोस, एकटा बसत जाऊ नकोस, चांगला खेळ अशा अनेक गोष्टी तिनं विशालला समजावून सांगितल्या. विशाल बाबांनाही मिस करत होता. आज तेही यायला हवे होते, असं विशाल आईला म्हणाला आणि याचवेळी  आणखी एका व्यक्तिच्या आठवणीत तो व्याकूळ झाला. तू तिला फोन कर, तिच्याशी बोल, असं विशाल आईला म्हणाला आणि त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सौदर्यांचा फोन आला होता.., असं आईनं त्याला सांगितलं. बहिणीनेही सौंदर्या हे नाव घेतलं. हे ऐकून विशालचा चेहरा असा काही खुलला की विचारू नका.  अर्थात आई सौंदर्याबद्दल आणखी बोलणार, तोच विशालनं तिला रोखलं. तिच्याबद्दल सांगायला अजून वेळ आहे,असं तो म्हणाला.याआधीही बिग बॉसच्या घरात विशाल सौंदर्याशी एकटाच बोलताना दिसला होता. साहजिकच ही सौंदर्या कोण? हा प्रश्न चाहत्यांना सतावू लागला. ही सौंदर्या कोण, कुठली, कशी दिसते, विशालची खास मैत्रिण आहे की आणखी कोण? असा प्रश्न   चाहत्यांना पडला आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठी