Join us  

Bigg Boss 3 Upadte: सोनालीने विकासवर केले गंभीर आरोप.टास्कदरम्यान झाला राडा  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 11:21 AM

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सुरू झाले “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य. आणि याच टास्क दरम्यान टीम A आणि टीम B मधील सदस्य एकमेकांना चांगलीच स्पर्धा देत असल्याचे दिसून आले.

छोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉस मराठी सीझन ३ सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. घरातील सदस्यांमध्ये दिवसागणिक होणारे वाद यामुळे बिग बॉस सुरुवातीच्या काही भागातच हिट ठरला आहे. इतकेच काय तर बिग बॉसकडून दिले जाणारे टास्क पूर्ण करण्यासाठी स्पर्धक आपली संपुर्ण मेहनत लावताना दिसतात. आर या पार म्हणत सगळे स्पर्धक टास्क पूर्ण करण्यासाठी एकमेकांना टक्कर देताना दिसतात.याच टास्कदरम्यान स्पर्धक एकमेकांना भीडताना दिसतात. गेल्या अनेक एपिसोड्समध्ये टास्कदरम्यान असे अनेकदा स्पर्धकांचे वाद झालेले पाहायला मिळाले आहेत.आता घरातले स्पर्धकांमध्ये होणारे वादही रसिकांसाठी काही नवीन राहिलेले नाही.असाच राडा आता पुन्हा एकदा घरात रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. हे वाद इतके विकोपाला जातात की, घरातले वातावरणाचा यावर परिणाम झालेला पाहायला मिळतो.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सुरू झाले “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य. आणि याच टास्क दरम्यान टीम A आणि टीम B मधील सदस्य एकमेकांना चांगलीच स्पर्धा देत असल्याचे दिसून आले. यामध्ये विशाल आणि विकासमध्ये मतभेद झाले तर दुसरीकडे सोनाली आणि विकासमध्ये बाचाबाची झाली.ज्यामध्ये सोनालीने विकासवर आरोप केला की तू माझ्यासाठी खेळला नाहीस.यापुढे ती असेदेखील म्हणाली की, मी तुझ्यासाठी नक्की खेळणार.काल कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी एकही सदस्य निवडला गेला नाही. कारण,दोन्ही टीममधील मतभेद आणि मारामारी. दादूस, सोनाली, गायत्री, विकास सगळे सदस्य कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवण्यास अयशस्वी ठरले.  नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत आज टास्कमध्ये मीरा आणि सोनालीमध्ये चांगलच राडा झाला आहे असे दिसले. मीरा आणि सोनालीमध्ये हाणामारी का झाली. हे आजच्या भागामध्ये समजेलच पण, मीरा असं देखील म्हणताना दिसणार आहे की, बिग बॉस मला हीच्यापासून धोका आहे. त्यावर विकास म्हणाला, सोनाली ती नाटक करते आहे धरून ठेव तिला. त्यावर जय चिडून म्हणाला तू शांत बसं विकास. मीराचं वाक्य आहे “आईशप्पथ सांगते आहे, बिग बॉस प्लीस थांबवा,नाहीतर ही गेली आज.

टॅग्स :बिग बॉस मराठी