Join us  

Bigg Boss marathi 3 update: पहिल्यांदाच घरात ढसाढसा रडली मीरा जगन्नाथ,घ्यावा लागाणार कठीण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 3:29 PM

Bigg Boss Marathi 3 अनेकदा टास्कसाठी स्पर्धकांना मनाच्या विरुद्ध जात काही गोष्ट कराव्या लागतात.आता असेच काहीसे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना देण्यात येणारे टास्क दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होत जाणार आहेत, असे दिसून येतं आहे. घरातले सगळेच स्पर्धक आपली हुशारी आणि कौशल्य दाखवण्यात कुठेही मागे नाहीत. बिग बॉसने दिलेला टास्क स्पर्धक पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसतात.अनेकदा टास्कसाठी स्पर्धकांना मनाच्या विरुद्ध जात काही गोष्ट कराव्या लागतात.आता असेच काहीसे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

 आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना काही कठीण निर्णय घ्यावे लागणार आहेत. कारण घरामध्ये रंगणार आहे “पारड कॅप्टन्सीचे” हे कॅप्टन्सी कार्य ! ज्यामध्ये पणाला लागणार आहेत सदस्यांच्या काही गोष्टी. जय किंवा विशाल या दोघांमध्ये रंगणार आहे हे कॅप्टन्सी कार्य. घरातील सदस्यांना ठरवायचे आहे बिग बॉस यांनी सांगितलेल्या गोष्ट ते जय – विशालपैकी कोणासाठी गमावण्यास तयार आहेत. घरातील सदस्य हे करण्यास नकार देखील देऊ शकतात. कॅप्टन पदाचे उमेदवार जय आणि विशाल यामध्ये कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. आज बिग बॉस मीराला सांगणार आहेत, कॅप्टन पदाच्या उमेदवाराला समर्थन करण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टी गमवाव्या लागणार आहेत. आणि त्या आहेत आपल्याकडील सॉफ्ट टॉय म्हणजेच अप्पू आणि दुसरी गोष्ट स्टोररूम मध्ये ठेवली आहे. आणि या दोन्ही वस्तू आपल्याला पूर्णत: नष्ट करायच्या आहेत.  

उत्कर्ष मीराला समजावताना दिसणार आहे, कठीण प्रश्न कठीण प्लेयरला पडतात, आपण त्याची उत्तरं काढायची. एज ए प्लेअर तू कशी आहेस बर्‍याचश्या गोष्टींनी दाखवून दिलंस ना टास्कमध्ये. मीरा म्हणाली मला झोप नाही येणार... उत्कर्ष म्हणाला, आम्ही गोष्टी सांगणार ना कॉमेडी आणि फालतूवाल्या.” मीरा त्याग करेल का ? आणि कोणासाठी करेल ते आजच्या भागामध्ये कळेलच.

टॅग्स :बिग बॉस मराठी