बिग बॉसच्या घरात एक आहे विनर तर दुसरा आहे लुजर,जाणून घ्या कोण आहेत ते स्पर्धक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 17:55 IST
नुकतेच प्रसारित झालेल्या भागात बानी,गौरव चोपडा आणि राहुल देव यांना शिक्षा भोगताना आपण पाहिले. मध्यरात्रीपर्यंत शिक्षा भोगल्यानंतर दिवसाची सुरूवात ...
बिग बॉसच्या घरात एक आहे विनर तर दुसरा आहे लुजर,जाणून घ्या कोण आहेत ते स्पर्धक
नुकतेच प्रसारित झालेल्या भागात बानी,गौरव चोपडा आणि राहुल देव यांना शिक्षा भोगताना आपण पाहिले. मध्यरात्रीपर्यंत शिक्षा भोगल्यानंतर दिवसाची सुरूवात धमाकेदार झाली.''हवा के साथ साथ'' या गाण्यावार स्पर्धकांनी डान्स केला. स्पर्धक पहिले टास्क विसरता न विसरत बिग बॉसने पुढचे टास्क स्पर्धकांसाठी आखून ठेवले होते. बानी लोपा आणि मोनालिसा तिघांनाही स्केटबोर्डला बुटांचे नॉट बांधण्याचा टास्क देण्यात येतो. या टास्कचे परिक्षण करण्याची जबाबदारी नविनवर सोपवली जाते. टास्क करत असताना लोपाला मध्येच थंडी वाजू लागल्याने रोहन तिला शॉल आणून देतो. मात्र टास्कदरम्यान कोणीही यांची मदत करू शकणार नाही असा नियम असतानाही रोहनने तिला मदत केल्यामुळे स्वामी ओमही यावर आक्षेप घेतात. दुसरीकडे बानीला भूक लागल्यामुळे लोकेश कुमारी बानीला खाण्यासाठी पदार्थ देताच नवीन लोकेशला पदार्थ देण्यास नाकारतो. यावेळी बानीला घडलेल्या प्रकाराचा राग येतो आणि दुजाभाव केला जात असल्याचे वाटते. शेवटी बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये लोपा जिंकते आणि बानी हरते.