Join us

बिग बॉस : मोनालिसाच्या सपोर्टसाठी येणार हा भोजपुरी सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 15:58 IST

मनू पंजाबीसोबतच्या जवळीकतेमुळे वादाच्या भोवºयात अन् चर्चेत आलेली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा घरातील अशी कंटेस्टेंट आहे जिने स्वत:च्या क्षमतेवर बिग ...

मनू पंजाबीसोबतच्या जवळीकतेमुळे वादाच्या भोवºयात अन् चर्चेत आलेली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा घरातील अशी कंटेस्टेंट आहे जिने स्वत:च्या क्षमतेवर बिग बॉसच्या घरातील आतापर्यंतचा प्रवास सर केला आहे. मनू, मनवीर आणि अश्रू या तीन हत्यारांचा वापर करीत ती गेममध्ये टिकून आहे. आता तिच्या सपोर्टसाठी एक भोजपुरी अभिनेता मैदानात उतरणार आहे. भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय असलेला हा सुपरस्टार मोनासाठी घरात येणार असल्याने घरातील तिचा प्रवास आणखी किती काळ राहणार हे बघणे मात्र औत्सुक्याचे ठरेल. बिग बॉसच्या डेब्यू सीजनमध्ये सहभागी झालेला सुपरस्टार रवि किशन मोनासाठी घरात प्रवेश करणार आहे. रवि न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी बिग बॉसच्या घरात येणार आहे. सूत्रानुसार ३१ डिसेंबर रोजी रवि किशन घरात प्रवेश करणार असून, तो मोनालिसाला काही टीप्स देणार आहे. मोनालिसाने रवि किशनबरोबर त्याची कोस्टार म्हणून बºयाचशा चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे रविची घरातील एंट्री तिच्यासाठी मानसिक पाठबळ देणारी ठरेल यात शंका नाही. मोनालिसा आतापर्यंत बिग बॉसच्या घरात बºयाचदा नॉमिनेट झाली आहे. मात्र भोजपुरी प्रेक्षकांनी तिला जबरदस्त सपोर्ट करीत तिला गेममध्ये कायम ठेवले आहे. गेल्या काही दिवसांपासून मोनालिसा, मनू आणि मनवीर या ‘एम’ फॅक्टरमध्ये पूर्वीसारखे संबंध राहिले नसल्याने मोनालिसा काहीसी एकाकी पडली आहे. आपल्या बॉयफ्रेंडमुळे चिंतित असलेल्या मोनालिसाला मनूने दूर केल्याने तिचे घरातील महत्त्व घटताना दिसत आहे. याचा परिणाम तिच्या घरातील प्रवासावर होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच रवि किशन याची एंट्री तिच्यासाठी दिलासादायक ठरेल यात शंका नाही.