Join us  

'तेनाली रामा'मध्‍ये साम्राज्‍यात परतलेल्‍या भास्‍करला उध्‍वस्‍त विजयनगर पाहून बसतो धक्‍का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 5:54 PM

कैकालासाठी एकच गोष्‍ट महत्‍त्‍वाची आहे, ती म्‍हणजे त्‍याची मुलगी आम्रपाली (मनुल चुडासामा). ती नेहमीच त्‍याच्‍या सरंक्षणाखाली असते

ऐतिहासिक काल्‍पनिक मालिका 'तेनाली रामा'ने नुकतेच २५ वर्षांचा लिप घेतला. आगामी एपिसोड्समध्‍ये मालिकेसाठी पूर्णत: नवीन सेटिंगसह अत्‍यंत प्रतिभावान नवीन कलाकार आणि पात्रं पाहायला मिळणार आहेत. मालिकेने लिप घेण्‍यापूर्वी प्रेक्षकांना पंडित रामकृष्‍ण ऊर्फ रामाच्‍या लक्षवेधक कथांसह मंत्रमुग्‍ध केले आहे. मालिकेला सुधारित लुक आणि रामाचा मुलगा भास्‍करच्‍या प्रवेशासह प्रचंड प्रेम व पाठिंबा मिळत आहे. रामाच्‍या भूमिकेत आपल्‍या अद्वितीय अभिनयासह प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केलेला कृष्‍णा भारद्वाज भास्‍करची भूमिका साकारणार आहे. तो आता मालिकेमध्‍ये दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. मालिका नवीन पात्रांचे पहिले लुक आणि बदललेले विजयनगर साम्राज्‍य सादर करण्‍यासाठी सज्‍ज आहे.भास्‍कर २० वर्षांनंतर त्‍याचे जन्‍मगाव विजयनगरमध्‍ये परत येतो आणि साम्राज्‍याची दयनीय स्थिती पाहून विचलित होऊन जातो. एकेकाळी समृद्ध असलेल्‍या विजयनगर साम्राज्‍यामध्‍ये आता भ्रष्‍टाचार पसरलेला आहे आणि भास्‍करला स्‍वत:चे घर रिकामे पाहून धक्‍का बसतो. त्‍या कुटुंबाचा कुठेच ठावठिकाणा नसतो. चिंतेने व्‍याकुळ झालेला भास्‍कर प्रतिष्ठित विजयनगर दरबाराकडे जातो. तेथे त्‍याला समजते की, कृष्‍णदेवराय आता राजा नाही आणि दुष्‍ट मंत्री कैकालाने (विश्‍वजीत प्रधान) दरबाराचा कारभार स्‍वत:च्‍या हाती घेतला आहे. कैकालाने त्‍याची दुष्‍ट वागणूक व शिक्षेसह संपूर्ण साम्राज्‍यामध्‍ये भितीचे वातावरण निर्माण केले आहे. कैकालासाठी एकच गोष्‍ट महत्‍त्‍वाची आहे, ती म्‍हणजे त्‍याची मुलगी आम्रपाली (मनुल चुडासामा). ती नेहमीच त्‍याच्‍या सरंक्षणाखाली असते.

असे म्‍हटले जाते की, 'जसे वडिल तसा मुलगा'. भास्‍कर मोठ्या धैर्याने कैकालाच्‍या दरबारामध्‍ये त्‍याच्‍या हरवलेल्‍या कुटुंबाचा मुद्दा मांडतो. पण दरबारात काही वेगळेच घडते. त्‍याला कैकालाच्‍या रागाला सामोरे जावे लागते आणि त्‍याला दरबाराबाहेर फेकण्‍यात येते. जिद्दी भास्‍कर नवीन राजा बाला कुमाराला (शक्‍ती आनंद) भेटण्‍याचा निर्धार करतो. तसेच तो कैकालाचा आमनासामना करण्‍याचा देखील सर्वतोपरी प्रयत्‍न करतो. या सर्व तणावग्रस्‍त परिस्थितीदरम्‍यान भास्‍कर व तथाचार्यची भेट होते. तथाचार्य (पंकज बेरी) त्‍याला गेल्‍या २० वर्षांमध्‍ये घडलेल्‍या घटनांबाबत सांगतो. हे ऐकून भास्‍कर त्‍वेषाने रागावतो आणि त्‍याचा नकळतपणे आम्रपालीला धक्‍का लागतो, जी तिचे वडिल कैकालासोबत जात असते. कैकाला त्‍याच्‍या सैनिकांना भास्‍कर पकडण्‍याचा आदेश देतो. 

भास्‍करची भूमिका साकारणारा कृष्‍णा भारद्वाज म्‍हणाला, ''मी या लिपसाठी  खूपच उत्‍सुक होतो आणि मला आता आनंद होत आहे की, आम्‍ही शूटिंगला सुरूवात केली आहे. हा माझ्यासाठी नवीन अनुभव आहे आणि मी आभारी आहे की, मला एका मालिकेमध्‍ये दोन विभिन्‍न भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली आहे. भास्‍कर हा रामाचा मुलगा असला तरी हे दोघेही त्‍यांच्‍यापरीने वेगळे व अद्वितीय आहेत. आगामी एपिसोड्स आमच्‍या लाडक्‍या प्रेक्षकांना नवीन विजयनगरचा पहिला लुक सादर करतील. तसेच नवीन पात्र व त्‍यांचे हावभाव पाहायला मिळतील. मी खूप खूश आहे आणि आमच्‍या प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे.''

कैकालाची भूमिका साकारणारा विश्‍वजीत प्रधान म्‍हणाला, ''मला मालिका 'तेनाली रामा'चा भाग असण्‍याचा आनंद होत आहे. मी कैकालाची भूमिका साकारण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. मी या लिपपूर्वी मालिकेला मिळत असलेली लोकप्रियता पाहिली आहे. माझी या मालिकेचा भाग बनण्‍याची इच्‍छा होती आणि मला ही संधी ऑफर करण्‍यात आली. सेटवर प्रत्‍येकाला भेटण्‍याचा अनुभव अद्वितीय आहे. मी या प्रतिभावान कलाकारांसोबत अभूतपूर्व काम करण्‍यासाठी उत्‍सुक आहे.''