Join us  

 हे ड्रग्ज नाही, सॅनिटायझर आहे...!  हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि भारती सिंह पुन्हा ट्रोल झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 4:51 PM

होय, भारतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि युजर्सनी भारतीचा क्लास घेतला. 

ठळक मुद्देजामिन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर पत्नी भारती सिंहसोबतच एक फोटो शेअर केला होता. मात्र फोटो शेअर केल्यावर भारती आणि हर्षला ट्रोलचा सामना करावा लागला होता.

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्स प्रकरणी अटक झाली आणि भारती कधी नव्हे इतकी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. आता भारती पुन्हा एकदा जबरदस्त ट्रोल होतेय. कारण काय तर तिचा व्हायरल व्हिडीओ. होय, भारतीचा  एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि युजर्सनी भारतीचा क्लास घेतला. 

 फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या ताज्या व्हिडीओत भारती आपल्या गाडीत बसलेली आहे. यादरम्यान ती तिचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करताना दिसते. सॅनिटायझरचा वापर कसा करावा, हे ती सांगतेय.   भारतीचा हा व्हिडीओ समोर आला आणि युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

 ‘वो ड्रग्ज नहीं, सॅनिटायझर है, असे म्हणत एका युजरने तिला ट्रोल केले. ही सॅनिटायझर का पितेय, ड्रग्ज समजून तर नाही ना? असे एका युजरने लिहिले आहे. काहींनी तिला गेट लॉस्ट, नशेडी अशा शब्दांत ट्रोल केले आहे. अर्थात  भारतीच्या काही चाहत्यांनी तिचा सपोर्टही केला आहे.ड्रग्स केसमध्ये अडकल्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला ब-याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांना भलेही जामीन मिळाला असली तरी लोकांच्या मनात त्यांच्या विषयी राग बघायला मिळत आहे.

जामिन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियावर पत्नी भारती सिंहसोबतच एक फोटो शेअर केला होता. मात्र फोटो शेअर केल्यावर भारती आणि हर्षला ट्रोलचा सामना करावा लागला होता. यादरम्यान हर्षने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले होते. कुणी भारती आणि हर्षला बॉयकॉट करण्याचे म्हटले होते तर कुणी थेट द कपिल शर्मा शो बॉयकॉट करा, अशा कमेंट केल्या होत्या. अशात एका युजरने जेव्हा भारतीला बॉयकॉट करण्याची कमेंट केली तर हर्षने त्याला ‘आता झोपा काका’, असे उत्तर दिले होते.एनसीबीने दोघांच्या घरी धाड टाकली असता तिथे त्यांना 86.5 ग्रॅम गांजा सापडला होता. ज्यानंतर दोघांनाही अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

टॅग्स :भारती सिंग