Join us  

हे तर भन्नाटच ! लॉकडाऊन दरम्यान घरात बसल्या बसल्या भारती पती हर्ष लिंबाचियासह करते 'हम तुम और क्वारंटाइन'साठी चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 6:43 PM

हर्ष लिंबाचिया दिग्दर्शक, कॅमेरामन अशी दुहेरी भूमिका करत आहे आणि सर्वांची मने जिंकणाऱ्या मालिकेच्या सर्व तांत्रिक घटकांची काळजी घेत आहे.

भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया देशातील सर्वात जास्त काम करणारे कॉमेडियन नक्कीच असावेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी, हे जोडपे स्वतःच संकल्पना रचत आहेत आणि हम तुम और क्वारंटाइनची निर्मीती करत आहेत, जो कलर्स वर प्रसारित होत आहे. ही मालिका गंमतीदार आणि खेळाची आहे असे दिसत असले तरी अपुऱ्या उपकरणांशिवाय आणि मनुष्यबळाशिवाय प्रत्येक दिवशी चित्रीत करण्याचे काम खूपच आव्हानात्मक आहे. पण भारती आणि हर्ष खूप प्रयत्नाने आणि उत्साहाने ते काम करत आहेत. 

या कपलने हुशारीने एकमेकांमध्ये कामाची वाटणी केली आहे आणि या लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांचे अखंड मनोरंजन करण्यासाठी ते दोघेही एकत्रितपणे काम करण्यात व्यस्त आहेत. भारतीला फॅशन खूप आवडते म्हणून तिने मेकअप व कॉस्च्यूम खाते स्वतःकडे घेतले आहे. ती स्वतःसाठी आणि हर्षसाठी योग्य ते पोशाख निवडत आहे. तसेच ती दोघांचाही मेकअप व हेअरस्टाइल करत आहे. तर दुसऱ्या बाजूला हर्ष, दिग्दर्शक, कॅमेरामन अशी दुहेरी भूमिका करत आहे आणि सर्वांची मने जिंकणाऱ्या मालिकेच्या सर्व तांत्रिक घटकांची काळजी घेत आहे.

 यावर बोलताना, भारती म्हणाली, "आम्ही दोघांनीही घरातील कामांची वाटणी करून घेतली आहे, त्यामुळे मी जर जेवण बनवत असेन तर तो  घरात साफसफाई करण्यात मदत करतो. आणि त्याचबरोबर आम्ही 'हम तुम और क्वारंटाइन'साठी चित्रीकरण करताना सुध्दा कामाची आणि जबाबदाऱ्यांची विभागणी केली आहे. मला दिसण्यावर प्रयोग करायला खूप आवडते त्यामुळे मी आनंदाने हर्ष आणि माझे दोघांचेही स्टाइलिंग व हेअर व मेकअप माझ्याकडे घेतला आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही दोघे पडद्यावर छान दिसू असा विश्वास वाटतो."

  हर्ष म्हणाला, "हम तुम और क्वारंटाइनच्या तांत्रिक घटकांविषयी भारतीला छान माहिती आहे. पण जेव्हा तिला असे वाटले की मी घरातील काहीच काम करत नाही, तेव्हा तिने ठरवले की मी मालिकेचे दिग्दर्शन करायचे, चित्रीकरण करायचे, आणि मालिकेशी संबंधित सर्व गोष्टी हाताळायच्या तसेच सुरूवात करण्याआधी जी उपकरणे दररोज आम्हाला ठिकठिकाणी बसवावी लागत असत ते काम करायचे.  भारती तिचा स्वतःचा तडका स्क्रिप्टमध्ये घालतेच आणि त्यामुळे ते सीन जास्त मजेदार होतात. आम्हाला दोघांना एकत्र काम करण्याचा आनंदही शब्दात व्यक्त न करण्यासारखाच आहे."

टॅग्स :भारती सिंग