Join us  

'भाबीजी घर पर है'ची धमाकेदार ६ वर्षे पूर्ण, सेटवर झाले दणक्यात सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 6:52 PM

'Bhabiji Ghar Par Hai मालिकने धमाल कथानक व मनोरंजनपूर्ण पात्रांसह मालिका अत्‍यंत लोकप्रिय बनली असून लाखो प्रेक्षकांच्‍या मनावर प्रभुत्‍व गाजवत आहे. कलाकार व टीमने नृत्‍य करत व केक कापत हा खास क्षण साजरा केला. 

'भाबीजी घर पर है'ने सहा वर्षांचा टप्‍पा पूर्ण केला आहे. मॉडर्न कॉलनीचे शेजारी-शेजारी राहणारे जोडपे मिश्रा आणि तिवारी दीर्घकाळापासून त्‍यांची विनोदीशैली व अभिनयासह प्रेक्षकांना हसवण्यात  यशस्‍वी ठरले आहेत. धमाल कथानक व मनोरंजनपूर्ण पात्रांसह मालिका अत्‍यंत लोकप्रिय बनली असून लाखो प्रेक्षकांच्‍या मनावर प्रभुत्‍व गाजवत आहे. कलाकार व टीमने नृत्‍य करत व केक कापत हा खास क्षण साजरा केला. 

 

सर्व कलाकार अनिता भाभी (नेहा पेंडसे), विभुती नारायण मिश्रा (आसिफ शेख), अंगूरी भाभी (शुभांगी अत्रे), मनमोहन तिवारी (रोहिताश्‍व गौड), सक्‍सेनाजी (सदानंद वर्मा), टी.एम.टी. (वैभव माथुर, दीपेश भान, सलीम झैदी) आणि मालिकेचे निर्माते बीनैफर कोहली व संजय कोहली यांच्‍यासह संपूर्ण मॉडर्न कॉलनी कुटुंबाने चांगल्‍या आठवणींना उजाळा दिला. कलाकारांनी मालिकेमधील त्‍यांच्‍या आवडत्‍या क्षणांबाबत, तसेच सलग सहा वर्षे मालिकेला प्रेक्षकांमध्‍ये लोकप्रिय करणा-या बाबींबाबत सांगितले.

नेहा पेंडसे (अनिता भाभी) म्‍हणाली, ''मी मालिका 'भाबीजी घर पर है'ची निस्‍सीम चाहती होती आणि एक प्रेक्षक म्‍हणून मी नित्यनेमाने मालिका पाहायची. ही मालिका माझ्यासाठी तणाव दूर करणारी होती आणि आता मी या मालिकेचा भाग असल्‍यामुळे धमाल व मस्‍ती दुप्‍पट झाले आहे. तसेच माझ्या मते ही पाहिलीच पाहिजे अशी मालिका आहे, कारण प्रत्‍येक पात्र अद्वितीय व नाविन्‍यपूर्ण आहे. या मालिकेने एक ओळख निर्माण केली आहे आणि प्रेक्षकांच्‍या मनात खास स्‍थान मिळवले आहे. मिश्राजींची विलक्षणता, तिवारीजींची विनोदीशैली ते अंगूरी भाभीची निरागसता व अनिता भाभीच्‍या स्‍मार्टनेसपर्यंत प्रत्‍येक व्‍यक्तिमत्त्व अत्‍यंत पुनर्परिभाषित करणारे व खास आहे.'' आसिफ शेख (विभुती नारायण मिश्रा) म्‍हणाले, ''आम्‍ही खूप लांबचा पल्‍ला गाठला आहे आणि मालिकेला सहा वर्षे पूर्ण झाल्‍यानिमित्त मी आमच्‍या प्रेक्षकांचे आभार मानतो, जे नेहमीच आमच्‍याप्रती दयाळू व प्रेमळ राहिले आहेत. हा प्रवास त्‍यांच्‍या पाठिंब्‍याशिवाय पूर्ण झाला नसता. तसेच माझ्या मते, मालिकेने केलेल्‍या अपवादात्‍मक कामगिरीमागील कारण म्‍हणजे अनुनाद घटक. प्रत्‍येकजण विविध पात्रांमध्‍ये, तसेच मालिकेमधील त्‍यांच्‍या कथांमध्‍ये सुरेखरित्‍या सामावून गेले आहेत. प्रत्‍येकामध्‍ये खास नाते निर्माण झाले आहे, जे माझ्यासाठी अत्‍यंत खास आहे.'' 

शुभांगी अत्रे (अंगूरी भाभी) म्‍हणाली, ''भाबीजी घर पर है ही पाहिलीच पाहिजे अशी मालिका आहे आणि त्‍यामागील कारण मी सांगते. या मालिकेची खासियत म्‍हणजे मालिका त्‍वरित लक्ष वेधून घेते. आपल्‍या सभोवताली अनेक घडामोडी घडत आहेत आणि त्‍यामधून संकेत घेत मालिकेच्‍या निर्मात्‍यांनी अनेकदा या घडामोडींबाबत सीक्‍वेन्‍स सादर केले आहेत. यामुळे प्रेक्षक मालिकेशी संलग्‍न होतात आणि मालिका अधिक उत्तम कलाकृती बनते. आम्‍हाला एक टीम म्‍हणून ६ वर्षांचा पल्‍ला गाठण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही आगामी वर्षांमध्‍ये देखील असेच प्रेम व पाठिंबा मिळत राहण्‍याची आशा करतो.''

 

टॅग्स :भाभीजी घर पर है