Join us  

भाभीजी घर पर है फेम सौम्या टंडन वाट पाहातेय मानधनाची... सांगतेय, काही दिवस चालेल इतकाच उरलाय पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 6:03 PM

सौम्या टंडनला कित्येक महिन्यांपासून मानधन मिळाले नसून पैसे संपल्यावर घर कसे चालवायचे हा प्रश्न तिला पडला आहे.

ठळक मुद्देसौम्या टंडनने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, मानधन खूपच उशिराने दिले जात आहे. माझे बरेचसे मानधन येणे बाकी आहे. मला मालिकेच्या निर्मात्यांवर विश्वास आहे की, ते लवकरच माझे पैसे परत करतील. पण या गोष्टीसाठी प्रचंड वेळ लागत आहे.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहून सरकारने लॉकडाऊन जाहीर केले आहे. आता सरकारने लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे काही लोक आता कामाला जायला लागले आहेत. पण अद्याप सिनेमा, मालिकांचे शूटिंग बंद आहे. त्यामुळे अनेकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. छोट्या पडद्यावर साहाय्यक भूमिकेत असलेले अनेक कलाकार आर्थिक तंगीविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. पण आता एका प्रसिद्ध मालिकेत काम करणाऱ्या नायिकेने तिला कित्येक महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याचे सांगितले आहे. 

भाभीजी घर पर है या मालिकेतील सौम्या टंडनने मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, मानधन खूपच उशिराने दिले जात आहे. माझे बरेचसे मानधन येणे बाकी आहे. मला मालिकेच्या निर्मात्यांवर विश्वास आहे की, ते लवकरच माझे पैसे परत करतील. पण या गोष्टीसाठी प्रचंड वेळ लागत आहे.

तिने पुढे सांगितले आहे की, अनेक कलाकार भाड्याच्या घरात राहातात. त्यांच्यावर त्यांच्या आई-वडिलांची, कुटुंबाची जबाबदारी असते. अशावेळी पैसे उशिराने मिळाल्यास त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. कलाकारांचे पैसे उशिराने देण्यामागे काय कारण आहे हे मला कळत नाहीये. वाहिनीकडून आम्हाला पैसे मिळाले नाहीत, कारण सध्या जाहिराती नाहीत असे काही प्रोडक्शन हाऊसेसचे म्हणणे आहे. पण आम्हाला काम केल्यानंतर ९० दिवसांनंतर पैसे मिळतात. त्यामुळे आमचे आधीचे पैसे तरी निर्मात्यांनी देणे गरजेचे आहे असे मला वाटते. काही दिवस तरी माझ्याकडे असणाऱ्या पैशांवर मी घर चालवेन... पण सगळ्यांची परिस्थिती सारखी नसते.

टॅग्स :भाभीजी घर पर हैसौम्या टंडन