Join us  

'भाभीजी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभी बनली नागीण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 11:40 AM

'भाभीजी घर पर है' या मालिकेतल्या मॉडर्न कॉलनीतले विभूती, तिवारी आणि अंगुरी हे तिघे पिकनिकसाठी बाहेर गेले आहेत, असे आगामी भागात आपण पाहणार आहोत.

भाभीजी घर पर है या मालिकेतील अंगुरी भाभी या भूमिकेमुळे शुभांगी अत्रेची लोकप्रियता वाढली आहे. तिचा कॉमेडी अंदाजाने तिने रसिकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. त्यामुळे दरवेळी वेगवेगळ्या अंदाजात शुभांगीला पाहणे रसिकांनाही आवडत आहे. आता लवकरच शुभांगी बनलेली अंगुरी भाभी चक्क नागीनच्या अवतारात रसिकांच्या भेटीला येणार आहे.

आता, तिच्या या नव्या नागीण अवतारामुळेही प्रेक्षक अवाक होणार आहेत. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतल्या मॉडर्न कॉलनीतले विभूती, तिवारी आणि अंगुरी हे तिघे पिकनिकसाठी बाहेर गेले आहेत, असे आगामी भागात आपण पाहणार आहोत. पिकनिकदरम्यान, हे तिघे एका हवेलीत येतात. या हवेलीत प्रवेश केल्यावर विभूतीसोबत काही विचित्र घटना घडायला सुरूवात होते. नक्की काय होते आहे, हे कुणालाच समजत नाही आणि अचानक विभूतीसमोर अंगुरी भाभी नागीण अवतारात उभी राहते.

शुभांगी म्हणाली, “टेलिव्हिजनवर प्रथमच नागीण साकारण्यासाठी मी फार उत्सुक होते. या विनोदी मालिकेत आता प्रथमच जरा गूढपणा येणार आहे. अंगुरी प्रथमच नागीण अवतारात येणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी ही उत्तम पर्वणी  असणार आहे. विभूतीसोबत इतक्या गूढ घटना का घडताहेत, यामागचे रहस्य उलगडत जाताना ही कथा अधिकच मजेशीर होत जाणार आहे.’’ अंगुरी भाभी नागीण कशी बनते आणि विभूतीसोबत इतक्या भयानक आणि गूढ घटना का घडताहेत, हे पाहणे फारच रोमांचक असणार आहे. 

टॅग्स :भाभीजी घर पर है