Join us  

शुभांगी अत्रेला बनायचंय मेरी कॉम,‘भाभीजी’लाला बॉक्सरची भूमिका साकारण्याची इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 12:15 PM

मेरी कॉमच्या जीवनावर शो आल्यास तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही असल्याचे तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे तरुणाईसह आपल्या लेकीनंही मेरी कॉमपासून शिकावं असेही शुभांगीला वाटते.

छोट्या पडद्यावरील रसिकांचं लाडकी व्यक्तिरेखा म्हणजे अंगुरी भाभी. अंगुरी भाभी साकारणाऱ्या अभिनेत्री शुभांगी अत्रे सुद्धा तितकी लोकप्रिय ठरत आहे. या भूमिकेतून शुभांगी अत्रेने रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केले आहे. शुभांगी अत्रे  प्रसिद्ध बॉक्सिंगपटू मेरी कॉमची मोठी चाहती आहे. काही दिवसांपूर्वीच मेरी कॉमने बॉक्सिंगचे सहावे विश्वविजेतेपद पटकावलं. शुभांगी अत्रे मेरी कॉमची इतकी मोठी चाहती आहे  की तिला आता मेरी कॉमची भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे तिने सांगितले आहे. मेरी कॉमचे कौतुक करत 'भाभीजी घर पर है' मालिकेच्या निर्मात्यांना मेरी कॉमच्या जीवनावर एक शो बनवण्याची विनंतीही तिने केली आहे. मेरी कॉमच्या जीवनावर रुपेरी पडद्यावर सिनेमा आला आहे. यांत देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्राने मेरी कॉमची भूमिका साकारली होती. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. या सिनेमाप्रमाणेच छोट्या पडद्यावरही मेरी कॉमच्या जीवनावर छोट्या पडद्यावर एक शो असावा अशी मागणीच तिने केली आहे. मेरी कॉमच्या जीवनावर शो आल्यास तरुणांसाठी तो प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही असल्याचे तिने म्हटले आहे. विशेष म्हणजे तरुणाईसह आपल्या लेकीनंही मेरी कॉमपासून शिकावं असेही शुभांगीला वाटते.

'मै आय कम इन मॅडम' मालिकेमुळे घराघरात पोचलेला अभिनेता संदीप आनंदने त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरक्ष: वेड लावलं. 'मै आय कम इन मॅडम' मालिका बंद झाल्यानंतर आता तो पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकत  आहे. 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील पुत्तन या लक्षवेधी आणि मनोरंजक व्यक्तिरेखेसाठी खूप प्रसिद्धी मिळालेला हा कलावंत मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर परतला आहे. त्याच्या या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळत आहे.

टॅग्स :भाभीजी घर पर है