Join us

​क्योंकी साँस भी कभी बहू थी फेम अमर उपाध्याय राहातो ५ बीएचके फ्लॅटमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:46 IST

क्योंकी साँस भी की बहू थी या मालिकेत अमर उपाध्यायने मिहीर ही भूमिका साकारली होती. मिहिरची ही भूमिका प्रेक्षकांनी ...

क्योंकी साँस भी की बहू थी या मालिकेत अमर उपाध्यायने मिहीर ही भूमिका साकारली होती. मिहिरची ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेत मिहिरचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले होते. पण त्यानंतर प्रेक्षकांनी बालाजी टेलिफ्लिम्सच्या ऑफिसवर मोर्चे काढले होते. तसेच अमरला मालिकेत परत आणण्यासाठी अनेक पत्रं देखील पाठवण्यात आली होती आणि त्यामुळेच या मालिकेची संपूर्ण कथा बदलून या मालिकेत अमर उपाध्यायची रिएंट्री करण्यात आली होती. अमर मालिकेत परतल्यानंतर काहीच दिवसांनी त्याचे बालाजी टेलिफ्लिम्सची सर्वेसर्वा एकता कपूरसोबत खटके उडाले आणि त्याने या मालिकेला रामराम ठोकला. अमर उपाध्यायने क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेनंतर जोडी क्या बनाई वाह वाह रामजी, धुंद द फॉग यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण छोट्या पडद्यावर अमरला मिळालेले यश मोठ्या पडद्यावर टिकवता आले नाही. त्यामुळे तो पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळला आणि त्याने सपना बाबूल का बिदाई, एक थी नायिका, साथ निभाना साथिया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. अमर गेली अनेक वर्षं अभिनयक्षेत्रात आहे. त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. आज त्याने पैसा, प्रसिद्धी सगळे काही मिळवले आहे. अमर सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील वर्सोवा या परिसरात ५ बीएचके फ्लॅटमध्ये राहातो. अमर वास्तूशास्त्राला प्रचंड मानतो. वास्तूशास्त्रात तज्ज्ञ असलेल्या त्याच्या एका मित्राने त्याला या घराबद्दल सांगितले असल्यानेच त्याने हे घर घेण्याचा निर्णय घेतला. हा त्याचा अलिशान फ्लॅट हा एखाद्या बंगल्याप्रमाणे आहे. या घरातील अनेक गोष्टी या वास्तूशास्त्राप्रमाणेच ठेवण्यात आल्या आहेत. अमर त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला कांदिवली मध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत वन रून किचनच्या घरात राहात होता. त्यानंतर त्याने मालाडमध्ये ३ बीएचकेचा फ्लॅट घेतला. पण त्याने चारच वर्षांत हे घर सोडले. या घरात राहात असताना अमरच्या आईचे निधन झाले. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने क्योंकी ही मालिका सोडली. या सगळ्या कारणांनी तो ड्रिप्रेशनमध्ये गेला होता. त्या घरात प्रत्येक ठिकाणी त्याला आईचीच आठवण येत असे आणि त्यामुळे त्याने हे घर विकण्याचा निर्णय घेतला आणि तो कुटुंबियांसमवेत अंधेरीला राहायला आला. Also Read : क्योंकी साँस भी कभी बहू थी सोडणं हा चुकीचा निर्णय