Join us

​सेम टू सेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2016 17:05 IST

सुलतान या चित्रपटात एका कुस्तीपट्टूची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. बढो बहू या मालिकेतही प्रिन्स नरूला एका कुस्तीपट्टूचीच भूमिका साकारत ...

सुलतान या चित्रपटात एका कुस्तीपट्टूची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. बढो बहू या मालिकेतही प्रिन्स नरूला एका कुस्तीपट्टूचीच भूमिका साकारत आहे. त्यामुळे ही मालिका पाहाताना प्रेक्षकांना सुल्तान या चित्रपटाची नक्कीच आठवण येणार आहे. पण ही मालिका पाहाताना सुल्तानची आठवण येण्याचे आणखी एक कारण आहे. सुल्तान या चित्रपटात झळकलेला सुमित सामनानी एका मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत तो अतिशय लठ्ठ आणि गर्विष्ठ अशा मुलाची भूमिका साकारणार आहे. तो लठ्ठ असला तरी त्याची पत्नी अतिशय सुंदर असावी अशी त्याची इच्छा आहे.