बरखा आणि स्मितात साम्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 15:48 IST
नामकरण या आगामी मालिकेत बरखा बिष्ट प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी नामकरण या मालिकेची कथा लिहिली ...
बरखा आणि स्मितात साम्य
नामकरण या आगामी मालिकेत बरखा बिष्ट प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी नामकरण या मालिकेची कथा लिहिली आहे. त्यामुळे या मालिकेच्या कलाकारांच्या निवडीतही महेश भट्ट यांनी विशेष लक्ष दिले. 200 मुलींची ऑडिशन घेतल्यानंतर अर्शीन नामदारची निवड अवनीच्या भूमिकेसाठी करण्यात आली. अवनी एक दहा वर्षांची मुलगी असून मालिकेची कथा तिच्याभोवतीच फिरणार आहे. या मालिकेत बरखा अवनीच्या आईची भूमिका साकारत आहे. बरखाच्या निवडीबाबत महेश सांगतात, "बरखाने केलेले काम मी पूर्वी पाहिले आहे. ती एक चांगली अभिनेत्री असल्यानेच तिची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. बरखाला पाहिल्यानंतर मला नेहमीच स्मिता पाटीलची आठवण येते. बरखा आणि स्मिता पाटील यांच्या दिसण्यात खूप साम्य असल्याचे मला वाटते."