Join us  

तारक मेहता का उल्टा चष्मा टिआरपी रेसमध्ये तिसऱ्या क्रमांकावर, जाणून घ्या कोणी पटकवला पहिला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 9:00 PM

बार्कच्या रिपोर्टनुसार तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे.

ठळक मुद्देसध्या नागिन ही मालिका पहिल्या नंबरवर असून कुंडली भाग्य ही दुसऱ्या नंबरवर आहे. तारक नंतर चौथ्या क्रमांकावर कुल्फी कुमार बाजेवाला तर पाचव्या क्रमांकावर कुमकुम भाग्य आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला अनेक वर्षं होऊन गेली असली तरी या मालिकेच्या लोकप्रियतेत थोडा देखील फरक पडलेला नाहीये. ही मालिका, या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहेत. जेठालाल, आत्माराम भिडे, माधवी भिडे, तारक, डॉ. हाथी, कोमल, सोढी, पोपटलाल, अय्यर, बबिता या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपलाशा वाटतात. या मालिकेत दया ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना कित्येक दिवसांपासून पाहायला मिळत नाहीये.

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दयाची भूमिका साकारणाऱ्या दिशा वाकानीने गरोदरपणातच या मालिकेला रामराम ठोकला होता. ती या मालिकेत नसल्याने या मालिकेच्या टीआरपीवर परिणाम होईल असे सगळ्यांना वाटत होते. पण या मालिकेला प्रेक्षकांची तितकीच लोकप्रियता मिळत आहे. आता तर बार्कच्या रिपोर्टनुसार या मालिकेने तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. सध्या नागिन ही मालिका पहिल्या नंबरवर असून कुंडली भाग्य ही दुसऱ्या नंबरवर आहे. तारक नंतर चौथ्या क्रमांकावर कुल्फी कुमार बाजेवाला तर पाचव्या क्रमांकावर कुमकुम भाग्य आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील जेठालाल आणि दया यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या दोघांच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. त्यामुळे दोघांची एकत्र धमाल रसिकांना पाहायची जणू काही सवयच झाली. मात्र गेल्या वर्षाभरापासून रसिकांची लाडकी दया ही 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून गायब आहे. दया फेम अभिनेत्री दिशा वाकानी कधी परतणार असा प्रश्न रसिकांना पडला आहे.

दिशा 2008 पासून 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मॅटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर पाच महिन्यांनी ती मालिकेत येईल असे बोलले जात होते. 2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरी ती मालिकेत कमबॅक करेल असं बोललं जात होतं. नवरात्रीमध्ये मालिकेत कमबॅक करणार असे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. पण असे झाले नाही.  

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा