Join us  

'बँड बाजा बंद दरवाजा' मालिकेतील भूत आहे प्रेमळ - नीलू कोहली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 7:15 AM

सोनी सबवरील बँड बाजा बंद दरवाजा मालिकेत सरिता खुरानाची भूमिका अभिनेत्री नीलू कोहली साकारीत असून ही हॉरर कॉमेडी मालिका आहे.

ठळक मुद्दे'बँड बाजा बंद दरवाजा' ही मालिका लवकरच सोनी सबवर होणार दाखल 'बँड बाजा बंद दरवाजा'ची कथा संजीव शर्मावर आधारीत

सोनी सबवरील बँड बाजा बंद दरवाजा मालिकेत सरिता खुरानाची भूमिका अभिनेत्री नीलू कोहली साकारीत असून ही हॉरर कॉमेडी मालिका आहे. या मालिकेतील भूत खूप प्रेमळ असल्याचे नीलू कोहली यांनी सांगितले. 

नीलू कोहली यांनी या मालिकेबद्दल सांगितले की, सरिता ही एक सर्वसाधारण उत्तर भारतीय आई आहे. तिचे सगळे आयुष्य नवरा, मुले, खायला काय करायचे, मुलाचे लग्न करणे याभोवतीच केंद्रित आहे. खूप सरळसोट भूमिका आहे.ही मालिका जरी हॉरर कॉमेडी या सदरात मोडत असली तरी प्रेक्षकांच्याचेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठीचे निखळ मनोरंजन आहे. आमच्या मालिकेतील भूत खूप प्रेमळ आहे. मी बघितलेल्या इतर हॉरर कॉमेडी मालिकांमध्ये बहुतेकवेळा भूत/चुडैल यांना विकृत दाखवलेले असते. आमच्या मालिकेतला मुख्य फरक म्हणजे या कार्यक्रमातील भूत हे खूपच प्रेमळ, चांगले आणि अर्थातच विनोदी आहे. मालिकेचे लिखाण खूप साधे सहज आणि प्रेक्षकांना आपलंसे करून घेणारे आहे

बँड बाजा बंद दरवाजा मालिकेच्या चित्रीकरणाचा अनुभव अफलातून असल्याचे नीतू कोहली यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की,  आम्ही जेव्हा मालिकेचे पहिले वाचन केले त्या दिवसापासून मला वाटते आम्ही सगळे भारावून गेलो. प्रत्येकजण स्वतःच्या व्यक्तिरेखेत शिरला. सगळ्यांच्या भूमिका खूप चपखल आहेत असे मला वाटते.

'बँड बाजा बंद दरवाजा' ही मालिका लवकरच सोनी सबवर दाखल होत आहे. या मालिकेची कथा संजीव शर्माची आहे. तो २५ वर्षांनंतर त्‍याच्‍या पूर्ण होऊ न शकलेल्‍या प्रेमिकेच्‍या जीवनामध्‍ये भूत बनून परत येतो. संजीवचे सरिता नावाच्‍या मुलीसोबत विवाह होणार असतो, पण ती तिचा प्रेमी चंदन खुरानासोबत पळून जाते. तो याच गोष्‍टीचा बदला घेण्‍यासाठी परत येतो आणि त्‍यांच्‍या मुलाला त्रास देऊ लागतो. संजीवचा विवाह न झाल्‍याने तो एकाकी जीवन जगतो. त्‍याची इच्‍छा असते की, सरिता व चंदनचा मुलगा रॉकीने देखील त्‍याच्‍यासारखेच जीवन जगावे, यावर आधारीत मालिका आहे.  

टॅग्स :सोनी सब