Join us  

तोरल रासपुत्रा कलर्सच्या उडानमध्ये साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 8:00 AM

मीरा देवस्थळे या मालिकेत चकोर या महत्त्वाच्या भूमिकेत झळकत होती. पण तिने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला.

ठळक मुद्देचकोर ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध व्यक्तिरेखा आहे आणि तिची लढाई पुढे नेण्यात मला आनंद आहे. मीरा कडे तिची ताकद होती आणि तिने हे पात्र अतिशय छान रंगवले होते आणि आता माझ्यापुढे चकोरचे पात्र रंगविण्याचे आव्हान आहे.

कलर्सवरील उडान ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत एका सामाजिक समस्येवर भाष्य करण्यात आले आहे. ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या प्रचंड आवडत्या आहेत. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या चकोरचा प्रवास प्रेक्षक गेल्या सहा वर्षांपासून पाहात आहेत. या मालिकेच्या कथेत आता काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. 

एका आत्मविश्वासी लहान मुलीपासून ते आई बनण्यासाठी लढण्यापर्यंतचा चकोरच्या जीवनाचा प्रवास चकोर या मालिकेत खूप चांगल्याप्रकारे या मालिकेत दाखवण्यात आला आहे. तसेच न्याय मिळण्यासाठी तिने धैर्याने केलेले अनेक संघर्ष सुद्धा यात निर्देशित केलेले आहेत. या शो मध्ये प्रेक्षकांना नुकताच दहा वर्षांचा लीप पाहायला मिळाला. आता या मालिकेत प्रेक्षकांना चकोर आणि सूरजची मुलगी अंजोर यांचा प्रवास पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अंजोरची भूमिका तान्या शर्मा साकारत आहे.

मीरा देवस्थळे या मालिकेत चकोर या महत्त्वाच्या भूमिकेत झळकत होती. पण तिने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला. आता या मालिकेत तिची जागा लोकप्रिय आणि टॅलेंटेड अभिनेत्री तोरल रासपुत्रा घेणार आहे आणि चकोरची लढाई पुढे नेणार आहे. या नव्या प्रवासाविषयी तोरल रासपुत्रा सांगते, “मालिका सुरू झाल्यापासून उडानच्या सशक्त कथानकामुळे या मालिकेने प्रेक्षकांशी नाळ जोडली आहे आणि त्यात सहभागी झाल्याचा मला अतिशय आनंद झाला आहे. चकोर ही टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध व्यक्तिरेखा आहे आणि तिची लढाई पुढे नेण्यात मला आनंद आहे. मीरा कडे तिची ताकद होती आणि तिने हे पात्र अतिशय छान रंगवले होते आणि आता माझ्यापुढे चकोरचे पात्र रंगविण्याचे आव्हान आहे. जरी हे आव्हानात्मक काम असले तरी मला आतून वाटत आहे की, प्रेक्षक मला चकोर म्हणून स्वीकारतील आणि माझ्यावर प्रेम करतील, पाठिंबा देतील. या पात्राला न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे.”

टॅग्स :कलर्स