Join us  

बाजीने केला 'हा' नवा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 1:44 PM

पेशवाईच्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे आणि या कथेत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा बाजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

ठळक मुद्दे बाजी एका शिलेदाराच्या पराक्रमाची कथा आहे हा शिलेदार अभिजीत छोट्या पडद्यावर साकारतो आहे

झी मराठी वाहिनीवर पेशवाईचा काळ असणारी व उत्कंठावर्धक कथा असलेली ‘बाजी’ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि या मालिकेने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मने जिंकली. पेशवाईच्या काळाचा संदर्भ घेऊन ‘बाजी’काल्पनिक कथा लिहिण्यात आली आहे आणि या कथेत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र हा बाजीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ही बाजी एका शिलेदाराच्या पराक्रमाची कथा आहे आणि हा शिलेदार अभिजीत छोट्या पडद्यावर साकारतो आहे.

शेक्सपियर म्हणून गेले नावात काय आहे? पण माणसाच्या नावात देखील खूप काही दडलेलं असतात. बाजी मालिकेत प्रमुख भूमिका बजावणारा अभिनेता अभिजित याच श्वेतचंद्र हे आडनाव ऐकून अनेक प्रेक्षकांना हे खरंच त्याच आडनाव आहे का? असा प्रश्न पडला. पण बऱ्याच लोकांना हे माहित नाही आहे की अभिजीतने त्याचं आडनाव हे त्याच्या आईवडिलांच्या नावातून साकारलं आहे. श्वेता आणि चंद्रकांत या नावांमधून 'श्वेतचंद्र' असं आडनाव तो लावत आहे.

या त्याच्या आडनावाबद्दल विचारलं असताना अभिजित म्हणाला, "मी आज जो काही आहे तो माझ्या पालकांमुळे. अभिनेता म्हणून करियर करतानाही केवळ पाठिंबाच नाही तर त्यांच्याकडून मला मोठी प्रेरणा मिळाली आहे. आपले पालक हि आपल्या सर्वांची खऱ्या अर्थाने संपत्ती असते. त्यांच्याकडून आपल्याला मिळालेले संस्कार, विचारसरणी, आपण उत्तम माणूस व्हावे यासाठी त्यांनी केलेले कष्ट या सगळ्या गोष्टी कायम आपल्या सोबत असतात. त्यांचे नाव हीच खरी आपली ओळख असते. त्यांचेच का आडनाव असू नये? असा विचार मनात आला आणि त्याक्षणी मी त्यांच्या नावापासून आडनाव करायचा विचार केला. माझ्या मातोश्री श्वेता आणि बाबा चंद्रकांत यांच्या नावातून मी श्वेतचंद्र असे आडनाव लावायला सुरुवात केली आहे. त्यांचे कौतुक होण्यापेक्षा त्यातील भावना समजून घेतली जावी असे मला वाटते."

टॅग्स :बाजी