Join us  

'बा बहू और बेबी'मधील ही अभिनेत्री आहे प्रेग्नेंट, फॉरेनरशी केलं आहे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 3:06 PM

या गोड बातमीचा खुलासा तिची मैत्रिण टिव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकने सोशल मीडियावर केला आहे. 

टेलिव्हीजनवरील बा बहू और बेबी फेम अभिनेत्री बेनाफ दादाचंदजीच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. बेनाफ दादाचंदजी आई होणार आहे. या गोड बातमीचा खुलासा तिची मैत्रिण टिव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकने सोशल मीडियावर केला आहे. बेनाफच्या बर्थ डेच्या दिवशी शक्ति- अस्तित्व एक एहसासची मुख्य अभिनेत्री रुबीना दिलैकने सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला. या फोटोसोबत लिहिले, Bennnyyyyyy this yearrrrrr your bday is so so Special! Looks like I had an intuition then ....... @benafd."फोटोत रुबीना, बेनाफच्या पोटावर हात ठेवून उभी आहे. या फोटोवरुन बेनाफ प्रेग्नेंट असल्याचे कळतेय. रुबीना आणि बेनाफ या एकमेकींच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघींमध्ये खूप चांगले बॉन्डिंग आहे.

बेनाफने फेब्रुवारी महिन्यात आपल्या चायनीज बॉयफ्रेंडसोबत गुपचुप लग्न केले होते. यानंतर तिने एक रिसेप्शन दिले होते यात राकेश बापट, रिद्धी डोगरा आणि शरद केळकरसारखे अनेक टिव्ही सेलिब्रेटी सामील झाले होते. आजतकच्या रिपोर्टनुसार, दोघे जवळपास नऊ वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. बेनाफचे नवरा शेफ आहे तो भारतात एक रेस्टॉरंट चालवतो.  

बेनाफने हॅलो, चायना गेट, बॉबी जाजूस मध्ये झळकली होती. याशिवाय ती बा बहू और बेबी, झांसी की रानी, छोटी बहु 2 अशा अनेक मालिकांमध्ये दिसली होती. 

टॅग्स :टिव्ही कलाकार