Join us  

चर्चा तर होणारच,अविका गौरने बॉयफ्रेंडसह शेअर केला रोमँटीक फोटो,एकत्र घालवतायत वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 1:01 PM

अविका गौरचा झालेला मेकओव्हर तुम्हाला स्पष्ट जाणवेल. तिच्या नव्या लूकने चाहत्यांचीही पसंती मिळवली होती. शेअर केलेल्या  प्रत्येक फोटोमधील अविकाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच होती. 

'बालिका वधू' मालिकेत आनंदीची भूमिका साकारत अविका गौरने तुफान प्रसिद्धी मिळवली होती. आजही तिला आनंदी म्हणूनच चाहते ओळखतात. गेल्या काही दिवसांपासून अविका छोट्या पडद्यावर झळकलेली नाही. सध्या ती अफेअरमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावरही ती खूप अ‍ॅक्टिव असते. सतत तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. 

तुर्तास अविका आणि मिलिंद यांच्या लव्ह स्टोरीची जोरदार चर्चा आहे. ते जे काही करतात त्याची आपसुकच चर्चा होते. मग ते कुठे आऊटिंग असो किंवा मग सोशल नेटवर्किंग साईटवरील फोटो. यामुळे हे कपल सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

 नुकताच अविकाने बॉयफ्रेंड मिलिंद चांदवाणीसोबतचा एक फोटो शेअर केला होता जो खूप व्हायरल झाला होता. या फोटोमुळेच अविकाचे आणि मिलिंद या दोघांमध्ये अफेअर असल्याचे समोर आले होते. आता आणखी एक फोटो समोर आला आहे. या  फोटोमध्ये  अविका बॉयफ्रेंड मिलिंदसह रोमँटीक पोजमध्ये दिसत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडाले आहेत. 

अविकाने शेअर केलेल्या फोटोत दोघेही क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचदरम्यानचे हे फोटो आहेत.फोटोच शेअर केले नाहीतर तर प्रेमाची जाहीर कबुली देत मी केलेली प्रार्थना प्रेमाच्या रुपात मला मिळाली आहे.माझ्या आयुष्यात मला खरे प्रेम मिळाले आहे. दोघेही आयुष्यभर एकमेकांचे आहोत. 

अविकाने आपले वजन कमी केल्यापासून ती खूप चर्चेत आहे.  काही महिन्यांपूर्वी, अविकाने इन्स्टाग्रामवर वजन कमी केल्यानंतर तिचा बदलेला लूकचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला होता. काही गोष्टींचे  कठोर पालन करत नित्यनियमाने वर्कआऊट योग्य डाएट फॉो करत 13 किलो वजन कमी केले होते.

अविका गौरने तिच्या साडीतील काही फोटो सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती, तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल अशा अदा पाहायला मिळत होत्या. या फोटोमध्ये अविकाचा झालेला मेकओव्हर तुम्हाला स्पष्ट जाणवेल. तिच्या नव्या लूकने चाहत्यांचीही पसंती मिळवली होती. शेअर केलेल्या  प्रत्येक फोटोमधील अविकाची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच होती. 

टॅग्स :अविका गौर